डॉ. कैलास कदम पिंपरी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष

कदम यांच्या नेतृत्वात १९९७ ला पहिली महिला बिनविरोध नगरसेविका पिंपरी पालिकेत निवडून आली होती.
डॉ. कैलास कदम पिंपरी कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष
Dr. Kailas Kadam Sarkarnama

पिंपरी- चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तो स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली नव्हती. अखेर ११ महिन्यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर कॉंग्रेसला गुरुवारी (ता.७) कप्तान मिळाला. कामगार नेते आणि पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव डॉ. कैलास कदम यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

Dr. Kailas Kadam
पी. एन. पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड

नाना पटोले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची कार्यकारिणी उशीराने यावर्षी २६ ऑगस्टला जाहीर झाली. त्यात साठेंना सचिव म्हणून घेण्यात आले. तसेच शहरातील गौतम आरकडे यांचीही यापदी नियुक्ती झाली. तेथेच शहराला नवे अध्यक्ष मिळण्याचे संकेत मिळाले होते. पण, त्याला उशीर झाला. मात्र,पालिका निवडणूक चार महिन्यांवर आल्याने अखेरीस कॉंग्रेस पक्षेश्रेष्ठींना हा निर्णय़ घ्यावा लागला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी प्रदेश कार्यकारिणीचा गुरुवारी विस्तार जाहीर केला.त्याजोडीने राज्यातील पक्षाच्या नव्या नऊ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणाही त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या संमतीने केली. त्यात डॉ कदम यांचा समावेश आहे.

२४ वर्षे पक्षाची एकनिष्ठेने  सेवा करूनही विधानपरिषदेसाठी डावलल्याने शहराध्यक्षपदी राहण्यास साठे हे अजिबात राजी नव्हते. त्यामुळे त्यांचा राजीनामा न घेता पक्षाने  गेल्यावर्षी २४ नोव्हेंबरला शहराध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. १६ जणांनी त्या दिल्या होत्या. त्यात डॉ. कदमही होते. ते तसेच मनोज कांबळे आणि अशोक मोरे यांनी आमच्या तिघांपैकी एक अध्यक्ष करा,आम्हाला चालेल,असे त्यावेळी सांगितले होते. तेच खरे ठरले. त्या तिघांतीलच अध्यक्ष झाला. दरम्यान, साठे यांनी पदासाठी विशिष्ट एकाची अशी शिफारस केली नव्हती. त्यामुळेही या नेमणुकीस विलंब झाला.

कदम यांच्या नेतृत्वात १९९७ ला पहिली महिला बिनविरोध नगरसेविका पिंपरी पालिकेत निवडून आली होती. २००७ च्या निवडणूकीत कदम यांच्या वहिनी निर्मला कदम या निवडून आल्या. २०१२ साली ते स्वतः व त्यांचे बंधू हे वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. ते पालिकेत विरोधी पक्षनेते झाले. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यही बनले.सध्या ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत.शहरातील कोकणवासीयांचा त्यांनी कोकण विकास महासंघ स्थापन केला आहे.

Related Stories

No stories found.