Devendra Fadanvis : आपल्या 'या' लाडक्या आमदारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली वाट वाकडी

Indrayani Thadi : दिल्लीतून औरंगाबादमार्गे येणार भोसरीतील खास `इंद्रायणी थडी`च्या उद्घाटनासाठी
Devendra Fadanvis, Mahesh Landage
Devendra Fadanvis, Mahesh LandageSarkarnama

Devendra Fadanvis and Mahesh Landage : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांचा आमदार लांडगे किती खास आहेत, हे त्यांनी विविध कृतीतून दाखवून दिले आहे. आता ते भोसरीतील एका कार्यक्रमासाठी दिल्लीहून वाकडी वाट करून उपस्थित राहणार आहे.

फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीला राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पक्षेश्रेष्ठींशी बोलणी करण्यासाठी मंगळवारी (दि. २४) गेले आहेत. दरम्यान, बुधवारी लांडगे यांचा देशात सर्वात मोठा महोत्सव असलेली 'इंद्रायणी थडी २०२३' (Indrayani thadi) बुधवार (दि. २५)पासून सुरु होत आहे. ती पाच दिवस म्हणजे २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Devendra Fadanvis, Mahesh Landage
Chandrasekhar Bawankule : भाजपचे ठरले, टोपेंच्या विरोधात विधानसभेला घाडगे..

या कार्यक्रमाचे उदघाटन सायंकाळी सहा वाजता फडणवीस हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री खास दिल्लीहून वाट वाकडी करून पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत येणार आहेत. त्यासाठी ते सकाळीच दिल्लीहून निघाले आहेत.

फडणवीस सकाळी औरंगाबाद येथे २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक नियोजनाच्या औरंगाबाद महसूल विभागाच्या राज्यस्तरीय बैठकीला उपस्थित राहिले. दुपारी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रचार सभा करून सायंकाळी ते विमानाने पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. 'इंद्रायणी थडी'चे उदघाटन केल्यानंतर रात्री आठ वाजता ते विमानाने नागपूरला जाणार आहेत.

Devendra Fadanvis, Mahesh Landage
Supriya Sule News: फडणवीसांच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,''देवेंद्रजी,आपसे...''

कोरोनामुळे दोन वर्षे स्थगीत झालेली 'इंद्रायणी थडी' (indrayani thadi) यंदा होत आहे. यापूर्वीच्या २०२० च्या या महोत्सवाचे उदघाटन फडणवीसांनीच केले होते. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. तसेच त्याअगोदरच्या २०१९ च्या या जत्रेत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी उपस्थित राहून बैलगाडीतून फेरफटकाही मारला होता. अशाप्रकारे 'इंद्रायणी थडी' आणि फडणवीस यांचे अतिशय जवळचे नाते आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून फडणवीस दांपत्यापैकी एकजण या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com