सत्ता असूनही भाजपने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द केली नाही 

"भारतीय जनता पक्षाचे मागील पाच वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होते; परंतु त्यांना मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न व्यवस्थित हातळता आला नाही. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द होऊ शकली नाही,'' असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला.
Despite being in power, the BJP did not cancel the Pavana underground pipeline
Despite being in power, the BJP did not cancel the Pavana underground pipeline

पवनानगर (जि. पुणे) : "भारतीय जनता पक्षाचे मागील पाच वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार होते; परंतु त्यांना मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न व्यवस्थित हातळता आला नाही. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द होऊ शकली नाही,'' असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केला. 

आमदार शेळके म्हणाले की, मावळ तालुक्‍यातील पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भातील शेतकऱ्यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन राजकारण न करता प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, राज्यात कोणाचेही सरकार असू द्या. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पवना बंदिस्त प्रकल्प रद्द केला पाहिजे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्याकडून येळसे येथील स्मारकाच्या ठिकाणी वेगवेगळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षापर्यंत शिवसेना पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात होती. तसेच, प्रत्येक श्रद्धांजली सभेसाठी शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत सक्रिय सहभागी असायची.

पण, सध्या शिवसेना ही राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे त्यांनी या श्रद्धांजली सभेसाठी भाजपसोबत न येता वेगळी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर रविवारी सकाळी 11 वाजता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या भागातील शेतकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासोबत स्मारकाच्या ठिकाणी येऊन गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या वेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, ज्येष्ठ नेते माऊली ठाकर, अमित कुंभार, बाळासाहेब मसूरकर, संजय मोहोळ, अनिल तुपे, बबन वर्वे, विजय ठाकर, अजित चौधरी यांच्यासह कार्येकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. 

द्रूतगती मार्गावर श्रद्धांजली 

पवना जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेला आज (ता. 9 ऑगस्ट) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे आजही घटनास्थळी जाऊन विधिवत पूजा व श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सचिन वाळके, रोहित गुरव, भावेश खराडे, मोरेश्वर देवकर व चिराग खराडे उपस्थित होते 

 
हेही वाचा : शेतकऱ्यांचा पुळका आलेल्या राष्ट्रवादीने पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द करावी 

पवनानगर (जि. पुणे) : पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मावळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर 9 ऑगस्ट 2011 रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला रविवारी (ता. 9 ऑगस्ट) 9 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने येळसे (ता. मावळ, जि. पुणे) स्मारकावर श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस जलवाहिनी नेण्यासाठी पहिल्यापासून आग्रही होती. आंदोलनातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे सांगणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज शेतकऱ्यांचा पुळका आला आहे. स्मारकावर येऊन श्रदांजली वाहण्याचे ढोंग केले, खरंच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर जलवाहिनी रद्द करून दाखवा.' 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com