पिंपरीतील कोविडचे जंबो रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोविडची दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये उभारण्यात येत आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 7 ऑगस्ट) पाहणी केली.
पिंपरीतील कोविडचे जंबो रुग्णालय 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार 
Covid Jumbo Hospital in Pimpri will be completed by 20 August

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने कोविडची दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक रुग्णालय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये उभारण्यात येत आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 7 ऑगस्ट) पाहणी केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये कोविडचे एक जंबो रुग्णालयात उभारण्यात येत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार, पीएमआरडीए, पीसीएमसी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यात कोविड संदर्भातील दोन जंबो रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील एकाचे काम पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे. या रुग्णालयात 616 ऑक्‍सिजन बेड, तर 200 आयसीयू बेड, असे एकूण 816 बेडची व्यवस्था असणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या जंबो रुग्णालय उभारणी कामाचा आढावा घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. या रुग्णालयात लागणारे मनुष्यबळ म्हणजे डॉक्‍टर, परिचारिका व सहाय्यक याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा रुग्णालयासारखे हे 816 खाटांचे कोविडचे जंबो रुग्णालय असणार आहे. या ठिकाणी डायलिसेसची सुविधा देण्यात येणार असून आयसीयू बेडही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांनी आरोग्य सुविधेबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आपल्याला शून्यावर आणायची आहे. नागरिकांनीही दक्षता घेऊन कोरोनापासून दूर राहावे, त्यासाठीच्या प्राथमिक उपाय योजना अंमलात आणाव्यात. यामध्ये ठराविक काळाच्या अंतराने हात धुणे, सॅनिटायझेशन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचविण्यास आपले प्राधान्य असणार आहे. 

मगर स्टेडियममध्ये उभारण्यात येणाऱ्या या जंबो कोविड रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह आयसीयूच्या दोनशे बेडचा समावेश असणार आहे. त्यात व्हेंटीलेटर व इतर सुविधा असतील. आधुनिक आरोग्य यंत्रणांनी सज्ज अशा जंबो कोविड रुग्णालयाचे काम येत्या 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in