भाजपच्या पाठिंब्याने काँग्रेस विजयी; तर भाजप बंडखोराला शिवसेनेची साथ

राजकीय समीकरणांची ऐशी की तैशी
lonawala-ff.jpg
lonawala-ff.jpg

लोणावळा: राज्य सरकारमध्ये कॉंग्रेस सत्तेत, तर भाजप विरोधी बाकावर आहे. मात्र, लोणावळा (जि. पुणे) नगरपरिषदेत हे दोन्ही पक्ष चार वर्षांपासून आघाडी करून सत्तेत आहेत. त्यामुळे आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सुधीर शिर्के हे भाजपच्या पाठिंब्याने विजयी झाले.

दरम्यान, राज्यातील नव्या सत्ता समीकरणाचा फटका या निवडणुकीत भाजपला बसून त्या पक्षात बंडखोरी झाली. व्हीप बजावूनही त्यांची चार मते फुटली. त्यामुळे कॉंग्रेस उमेदवार या चुरशीच्या लढतीत अवघ्या दोन मतांनी विजयी झाला. भाजपच्या बंडखोर उमेदवाराला येथे राज्यात आता कट्टर शत्रू बनलेल्या शिवसेनेची साथ मिळाली, हे विशेष.

वर्षभरापूर्वी राज्यातील सत्तेत आकारास आलेल्या नव्या समीकरणाचा फटका लोणावळा नगरपरिषेतील चार वर्षे जुन्या भाजप, कॉंग्रेस, आरपीआय, अपक्ष आघाडीला आज उपनगराध्यक्ष निवडणुकीत बसला. येथे आघाडीच्या सत्तेत भाजपचाच नगराध्यक्ष व उपनराध्यक्ष होते. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली.

कॉंग्रेसचे उमेदवार शिर्के यांना १४ मते पडली. त्यांनी बंडखोर भाजप उमेदवार गौरी मावकर यांचा चौदा विरुद्ध बारा असा दोन मतांनी पराभव केला. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. मुख्याधिकारी रवी पवार यानी सहाय्यक म्हणून काम पाहिले. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत काँग्रेसचे शिर्के यांच्याबरोबर आघाडीतील भाजपच्या मावकर यांनीही अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक झाली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मावळते उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, देविदास कडू, ब्रिदा गणात्रा, रचना सिनकर, सहयोगी सदस्य राजू बच्चे, मंदा सोनवणे, आरपीआयचे दिलीप दामोदरे, काँग्रेसचे सदस्य आरोही तळेगावकर, संध्या खडेलवाल, सुवर्णा अकोलकर, पूजा गायकवाड, संजय घोणे यांनी शिर्केंना, तर मावकर यांच्या बाजूने शिवसेनेच्या शादान चौधरी, सिंधू परदेशी, कल्पना आखाडे, शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सुनील गुळकर, भाजपचे भरत हरपुडे, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर, अपक्ष सेजल परमार, अंजना कडू यानी मतदान केले लोणावळ्यात कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबर प्रलंबित विकासकामाना गती देणार असल्याचे श्री. शिर्के यांनी निवडीनतर सांगितले.

'व्हीप' ला वाटाण्याच्या अक्षता
भाजपचे गटनेते देविदास कडू यांनी या निवडणुकीत शिर्के यांना मतदान करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता. मात्र तो न जुमानता भाजपचे भरत हरपुडे, अपर्णा बुटाला, जयश्री आहेर यांनी मावकर यांना मतदान केले. देशात काँग्रेस ही भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करायला लावणे, ही संशय निर्माण करणारी बाब असल्याचे भाजपच्या नगरसेविका बुटाला यांनी म्हटले आहे. तसेच ही काँग्रेसला मतदान करणे हीच पक्षविरोधी कृती असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com