Chinchwad By-Election : काँग्रेस चिंचवड लढवण्यावर ठाम : अर्ज भरण्यास सुरुवात

Chinchwad Congress : उमेदवारीबाबत निर्णय नसल्याने महाविकास आघाडीत तेढ निर्माण होण्याची शक्यता
Chinchwad Congress
Chinchwad CongressSarkarnama

Chinchwad Congress : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक (By-election) २६ फेब्रवारी रोजी होणार आहे. या दोन निवडणुकीसाठी सर्व पक्षातून इच्छुकांची यादी मोठी आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या दोन मतदारसंघात नेमकी कोणाला उमेदवारी देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा (Kasaba) आणि चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूकांनी तयारी सुरू केली आहे. मात्र कोणीही उमेदवार जाहीर केलेला नाही. असे असतानाही कॉंग्रेसने चिंचवडमधून इच्छूकांचे अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे.

या मतदार संघातून निवडणूक लढण्यावर काँग्रेस (Congress) ठाम असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा (Chinchwad) बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न वाया जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Chinchwad Congress
Politics : 'चिंचवड'ची पोटनिवडणूक लाखाच्या लीडने जिंकण्याची भाजपची डरकाळी

दरम्यान चिंचवडमधून लढण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही लढण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केले आहे. आता तर कॉंग्रेसने इच्छूकांचे थेट अर्जच घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता आघाडीतील उमेदवारीवरून तिढा वाढल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Chinchwad Congress
Chinchwad, Kasba By-Elections : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे विधान...

चिंचवड लढण्यावर कॉंग्रेस ठाम असून पक्षश्रेष्ठींकडेही ही मागणी लावून धरणार असल्याचे कदम यांनी सांगितले. एवढेच नाही, तर सहा इच्छूकांचे उमेदवारी मागण्यासाठी पक्षाकडे अर्ज आले आहेत. तसेच आणखी तिघे अर्ज करणार आहेत, अशी माहितीही कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, "प्रदेश काँग्रेसच्या दोन फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यावेळी पक्षाचा उमेदवार चिंचवडमधून उभा केला जावा, ही प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी ठामपणे मांडू. त्याचवेळी आघाडीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्यासाठी जबाबदारी शहर काँग्रेस घेणार आहे", असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

Chinchwad Congress
Patan : मुंबईकर शेठजींमुळे निवडणुकांत पैशांचा तमाशा... सत्यजितसिंह पाटणकर

पक्षाचे चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे संजय काळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, जमाते उलेमियाचे अध्यक्ष गुलजार भाई, तेलगू समाज संघाचे अध्यक्ष बसवराज शेट्टी, ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंद फडतरे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in