ठाणे, पुण्यानंतर पिंपरीतही केतकी चितळेंविरुद्ध पोलिसांत तक्रार

केतकी चितळेसारखी Ketki Chitale विकृत मानसकिता घडविणा-यांचा पिंपरीत Pimpari राष्ट्रवादीकडून NCP निषेध, रोख कुणाकडे?
Ketaki Chitale case news updates
Ketaki Chitale case news updatessarkarnama

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील विखारी टीकेची कविता सोशल मिडियात शेअर करणारी अभिनेत्री केतकी चितळेंवर चौफेर हल्लाबोल सुरु झाला आहे. ठाणे आणि पुण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पिंपरी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.१४) तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे येथेही तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे. (Ketaki Chitale case news updates in Marathi)

दरम्यान, राज्यभरच केतकीचा तीव्र निषेध करून तिच्याविरुद्ध एकामागोमाग एक तक्रारी दाखल होऊ लागल्याने आता तिची वरात राज्यभर निघण्याची शक्यता आहे. तिने शरद पवार यांच्याबद्दल विकृत मानसिकतेतून पोस्ट टाकली असल्याचा हल्लाबोल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने आज केला. तिची ही विकृत मानसिकता घडविणा-यांचाही त्यांनी निषेध केला.

Ketaki Chitale case news updates
केतकी चितळेंविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांची पोलिसांत तक्रार...

तिच्यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडमधील ज्य़ेष्ठ नेते तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी केली. त्यासाठी त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना पत्र दिले. त्यानंतर ते म्हणाले, ''कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा कायम सन्मान राखणारे, तसेच अशा विविध क्षेत्रीतील मंडळींच्या मदतीला धावून जाणारे देशातील एकमेव नेते म्हणून पवारसाहेबांची ओळख आहे.''

Ketaki Chitale case news updates
'शरद पवार आमचा बाप, त्यांच्यासाठी मंत्रीपद गेलेतरी बेहत्तर'

परंतु, मागील काळात राज्यासह देशात विकृत मानसिकता घडविण्याचे काम सुरू आहे. धर्म, जातीय तेढ निर्माण करताना आपल्या विरोधी भूमिका मांडणा-या नेत्यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे. केतकी हा त्याचा एक भाग आहे. पवारसाहेबांचे कार्य आणि वाटचाल समजून घेण्यासाठी तेवढी बौध्दिक क्षमता आवश्यक आहे. ती नसलेल्या लोकांच्या सहवासामुळे केतकीसारखे लोक काहीही बरळत असतील. परंतु, ते महाराष्ट् आणि पवारसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता सहन करणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com