By Election : चिंचवडची पोटनिवडणूक मुद्द्यांवरून गुद्यावर; आता भाजप पदाधिकाऱ्याच्या कुटुंबाला मारहाण

BJP vs NCP : पैशांचे वाटप करीत असल्याच्या संशयातून केली मारहाण
Crime News
Crime NewsSarkarnama

Wakad Police : चिंचवडची पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. परिणामी आता ही निवडणूक मुद्द्यांवरून गुद्यांवर आल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखावर बुधवारी (ता. २२) भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपच्या प्रभाग अध्यक्ष माधव मनोरेंसह त्यांच्या कुटंबाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

माधव मनोरे यांच्यासह त्यांची दोन मुले आणि कुटुंबातील दोन महिलांना मारहाण केली. मारहाण आणि महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माधव मनोरेंच्या पत्नी रेणूका (वय ४४ रा. कृष्णा सोसायटी, मथुरा कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जमाव जमवून मारहाण करणे आणि विनयभंग केल्याप्रकरणी ऋतीक काटे, हर्षल काटे, राकेश काळे व इतर दोन-तीनजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Crime News
Politics : देशातील विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव; चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका

आरोपी हे राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आहेत. त्यात उमेदवाराचा पुतण्याचाही समावेश असल्याचे माधव मनोरे (Madhav Manore) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. आपण भाजपच्या उमेदवारासाठी मतदारांना पैसे वाटल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याचेही ते म्हणाले.

Crime News
Ashok Chavan News : न्यायमुर्ती स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, लोकांनी न्याय मागायला कुठे जायचे?

रहाटणी येथे शुक्रवारी (ता. २४) रात्री दहा वाजता माधव मनोरेंसह तिघांना मतदारांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये, भाजप उमेदवाराच्या स्लिप आणि मतदारांच्या नावाची यादी हस्तगत केली होती.

त्याबाबत त्यांच्याविरुद्ध वाकड पोलीस (Wakad Police) ठाण्यातच मध्यरात्रीनंतर साडेतीनच्या सुमारास एनसी दाखल करण्यात आली. हा अदखलपात्र गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होत असतानाच रहाटणीत मनोरे कुटुंबाला मारहाणीचा दखलपात्र गुन्हा घडत होता.

Crime News
Rohit Pawar : वंचित बहुजन आघाडीवर रोहित पवारांचा मोठा आरोप : म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मध्यरात्री साडेतीन वाजता एका आलिशान मोटारीतून (एमएच १४ जेपी १२१२) मनोरेंच्या घरी आले. त्यांनी माधव मनोरे आणि त्यांची मुले सोमनाथ, विश्वनाथ यांना मतदारांना पैसे वाटल्याच्या संशयावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

ते पाहून त्यांच्या पत्नी रेणूका व सुमित्रा या पती, मुलांना सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनाही ऋतिक आणि राकेशने मारहाण केली. अश्लील शिवीगाळ केली. त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.

Crime News
By-Election : चिंचवडमध्ये ५१० मतदान केंद्रावर तीन हजार कर्मचारी अन् पावणेचार हजार पोलीस तैनात

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी (एपीआय) संतोष पाटील, शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे एपीआय हरीश माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पुढील कार्यवाही केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com