वडगावच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाघमारे 

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्‍यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक चंद्रजित दिनकर वाघमारे यांची मंगळवारी (ता. 11 ऑगस्ट) बिनविरोध निवड झाली. समर्थकांनी निवडीनंतर फटाक्‍यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला.
Chandrajit Waghmare of NCP as the Deputy president of Wadgaon
Chandrajit Waghmare of NCP as the Deputy president of Wadgaon

वडगाव मावळ (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्‍यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक चंद्रजित दिनकर वाघमारे यांची मंगळवारी (ता. 11 ऑगस्ट) बिनविरोध निवड झाली. समर्थकांनी निवडीनंतर फटाक्‍यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. 

पक्षांतर्गत ठरलेला कालावधी पूर्ण झाल्याने या अगोदरच्या उपनगराध्यक्षा माया चव्हाण यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला होता. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली आहे. 

सत्ताधारी महाविकास आघाडीकडून चंद्रजित वाघमारे यांनी, तर भारतीय जनता पक्षाकडून उपनगराध्यक्षपदासाठी दिलीप म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपचे म्हाळसकर यांनी निर्धारित वेळेत माघार घेतल्याने उपनगराध्यक्षपदी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केली आहे. 

या वेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, गटनेते राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, प्रमिला बाफना यांच्यासह सर्वच्या सर्व सतरा नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, गंगाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुनील ढोरे, विशाल वहिले, सुदाम कदम, अंकुश आंबेकर, प्रवीण ढोरे, राजेश बाफना, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, अफताब सय्यद, अतुल राऊत आदींच्या उपस्थितीत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. 

भाजपने वडगाव शहराच्या विकासासाठी व सहकार्यासाठी म्हाळसकर यांचा अर्ज मागे घेतल्याचे भास्करराव म्हाळसकर यांनी सांगितले. पक्षभेद विसरून सर्व नगरसेवक शहराचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे बबनराव भेगडे यांनी व्यक्त केला. प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्ष कार्य केल्याचे हे फळ आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष वाघमारे यांनी दिली आहे. 
 
हेही वाचा : रमेश थोरातांनी मुलाला पुढे आणले; दौंडमध्ये कुल-थोरातांमध्येच सामना 

केडगाव (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्‍यात तिसऱ्या घराणेशाहीचा उदय होऊ पाहत आहे. माजी आमदार आणि पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या दुसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. गलांडवाडी (ता. दौंड) येथील कृष्णाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार ऊर्फ गणेश थोरात यांची बिनविरोध निवड झाली. सक्रिय राजकारणात असले तरी तुषार थोरात यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिलेच पद आहे. तुषार यांच्या घराण्याची राजकीय पार्श्‍वभूमी पाहता हे पद छोटे असले तरी त्यांची राजकीय वाटचाल ही विधानसभेच्या दृष्टीने चालू झाली आहे. 

सन 1972 पासून 1990 पर्यंत दोन वर्षांचा अपवाद वगळता दौंड तालुक्‍यावर जगदाळे घराण्याची सत्ता होती. 1990 पासून ते आतापर्यंत पाच वर्षांचा कालावधी वगळता तालुक्‍यावर कुल घराण्याची सत्ता आहे. आता तुषार थोरात यांची राजकारणात एन्ट्री झाल्याने थोरात यांच्या घराणेशाहीची चर्चा होऊ लागली आहे. रमेश थोरात यांच्या राजकारणाचा पाया विविध सहकारी सोसायट्यांवर आधारलेला आहे. याच सोसायट्यांमधून तुषार थोरात यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com