Pimpri Chinchwad Politics: पिंपरीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली, 'केबल नेटवर्क'वरून राजकारण तापलं

Bjp vs Ncp : .. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे....
ncp vs bjp, Pimpri chinchwad politics, cabal network
ncp vs bjp, Pimpri chinchwad politics, cabal networkSarkarnama

Pimpri Chinchwad News: पिंपरीः दुबई कनेक्शन गुन्हेगारांच्या कंपनीला पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केबल इंटरनेट नेटवर्कचे काम देऊ नये अशी मागणी करूनही याच कंपनीला ते देण्यात आल्याने राष्ट्रवादी संतापली आहे. त्यामुळे दिलेले हे काम त्वरित मागे घेतले नाही,तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी आता दिला आहे.

भ्रष्टाचाराच्या खटाटोपात शहराची वाट लावण्याचा आणि नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणारा हा दुर्दैवी प्रकार असल्याने सदर निविदा त्वरित रद्द करावी, अन्यथा पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा २१ डिसेंबरला राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिला होता. मात्र, तो न जुमानता त्यानंतर (ता.२३) झालेल्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निविदा मंजूर करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत पिंपरी महापालिकेतील माजी सत्ताधारी भाजप(Bjp)वर सडकून टीका केली.

ncp vs bjp, Pimpri chinchwad politics, cabal network
Maharashtra Politics : शिंदे, सत्तारांनंतर आता शंभूराज देसाईंचा नंबर : महाबळेश्वरमधील ते प्रकरण येणार अंगलट

त्याला या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे पालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके (Namdeo Dhake) यांनी लगेच दिले. त्यांनीही ही वादग्रस्त निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी आयुक्त तथा प्रशासकांकडे केली.त्यामुळे या केबल नेटवर्कवरून या दोन्ही माजी सत्ताधाऱ्यांत जुंपली आहे.

एकीकडे देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्यांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. हे काम दिलेल्या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत,असा दावा अजित गव्हाणेंनी (Ajit Gavhane) पुन्हा केला.

केबल इंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाहीत.महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माण कऱण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते. इतकेच नाही, तर अतिरेकी कारवायासुध्दा होऊ शकतात. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे,असे ते म्हणाले.

ncp vs bjp, Pimpri chinchwad politics, cabal network
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह इंच न इंच जमीन महाराष्ट्रात आणू : विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

तर,केबल नेटवर्किंगसाठी तयार केलेले अंडरग्राउंड डक्ट भाड्याने देण्याच्या कामाला राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’असून त्यांचाच त्यात छुपा हात आहे असा उलट आरोप ढाकेंनी केला.

इंटरनेट नेटवर्किंगसाठी तयार केलेले अंडरग्राउंड डक्ट भाड्याने देण्याच्या कामावरुन राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी मगरमच्छ के आँसू ढाळत आहेत,असा हल्लाबोल त्यांनी गव्हाणेंवर नाव न घेता केला.या निविदा प्रक्रियेची सुरूवात महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात झाली.तसेच या माजी सत्ताधार्यांच्या राजवटीतच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या सूचनेनुसार नियुक्ती झालेले पिंपरी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार यादव यांनीच या कामाची निविदा प्रक्रिया राबवली याकडे ढाकेंनी लक्ष वेधले. यातून या कामात राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in