पिंपरी महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा विक्रम केला; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गव्हाणेंचा हल्लाबोल

Pimpri Chinchwad News : भाजपच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाडा, राष्ट्रवादीने फुंकले पिंपरी महापालिका निवडणुकीचे रणशिंग
Ajit Gavhane
Ajit GavhaneSarkarnama

पिंपरी : ना भय, ना भ्रष्टाचारचा नारा देऊन, २०१७ ला पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने भ्रष्टाचाराचा हैदोस घालून पालिका लुटण्याचा विक्रम केला, असा हल्लाबोल करीत त्यांचा हा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे, असे रणशिंग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काल फुंकले. (Pimpri Chinchwad News)

Ajit Gavhane
लाखो लोक बेघर; पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

शहर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मासिक सभेत गव्हाणे बोलत होते. एकीचं बळ आणि मिळणार फळ या तत्त्वाने आपण सर्वजण प्रामाणिकपणे शहरवासीयांच्या हितासाठी अजितदादांच्या मार्गदर्शनानुसार काम केलं आहे आणि करीत आहोत. पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा कायापालट आणि विकास अत्यंत गतिमान पद्धतीने झाला आहे. पण, मागील पाच वर्षात भाजपने सत्तेचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचा किळसवाणा कळस केला आहे. तो जनतेसमोर प्रत्येक कार्यकर्त्याने मांडला पाहिजे.त्याचबरोबर राष्ट्रवादीने केलेल्या विकासाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे, असे अपेक्षेवजा आवाहन त्यांनी केले. माजी महापौर मंगल कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, नारायण बहिरवाडे, फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक अध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी सेल अध्यक्ष यश साने आदींसह पक्षाचे अनेक आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

Ajit Gavhane
कॉंग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेऊन भाजपला मतदान केलं ;पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

गव्हाणे शहराध्यक्ष झाल्यानंतर सुरू झालेल्या मासिक सभा उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र याप्रसंगी दिसून आले. या सभेत निवडणुकीची तयारी कशी करावी, यावर माझी महापौर कदम यांनी, बुथ कमिटी नियोजनावर शितोळे व अरुण बोराडे यांनी, तर पक्षाचे चौकाचौकात फलक व त्याचे महत्त्व यावर बहिरवाडे यांनी मार्गदर्शन केले.पक्षप्रवक्ते व मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर शहराध्यक्षांच्या सर्व प्रभागातील होणाऱ्या दौऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली. सभेच्या सुरुवातीलाच मावळ तालुक्याच्या कोथुर्णे गावातील चिमुरड्या निर्भयाला श्रद्धांजली वाहून या गुन्ह्यातील नराधमास कठोर शिक्षा व्हावी, महाविकास आघाडी सरकारने तयार केलेला शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करावा, असा ठराव रणसुभे यांनी मांडला. त्यास बहिरवाडे यांनी अनुमोदन दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com