Laxman Jagtap : पिंपरीच्या राजकारणातील 'राम-लक्ष्मणा'च्या जोडीतल्या एकाच्या जाण्यानं दुसरा गहिवरला..

Laxman Jagtap And Mahesh Landge : राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी मी हे पक्षाचं ब्रीद आमदार जगताप यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले...
Laxman Jagtap & Mahesh Landge
Laxman Jagtap & Mahesh LandgeSarkarnama

उत्तम कुटे

पिंपरीः उद्योगनगरीतील चिंचवडचे भाजपचे आमदार आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर काल (ता.३) संपली. शहराचे कारभारी असलेले आमदार जगताप यांच्या आठवणींना शहराचे दुसरे कारभारी भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी उजाळा दिला.

या दोघांची जोडी शहराच्या राजकारणात राम-लक्ष्मण म्हणून ओळखली जात होती. जगताप यांचं श्रेष्ठत्व आमदार लांडगेंनी त्यांच्या आठवणी जागवताना नि:संशय मान्य केले. (BJP MLA Mahesh Landge told the memories of MLA Laxman Jagtap)

पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सभागृहात कामकाज कसे करावे? विषय कसे मांडावे? लक्षवेधी कशी द्यावी? यांसारख्या छोट्याछोट्या गोष्टी देखील त्यांनी शिकवल्याचं आमदार महेशदादा यांनी सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, राजकारण करत असताना जगताप हे नेहमी तत्वाशी एकनिष्ठ राहायचे.आपला स्वाभिमान, बाणेदारपणा कायम राखण्याचं आदर्शवत राजकारण त्यांनी जपलं. ते आम्हा नवोदितांना शिकवलं. पिंपरी-चिंचवडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जेव्हा पुढे आला त्यावेळी त्यांनी पक्ष, राजकारण देखील झुगारले होते अशी आठवण लांडगेंनी सांगितली.

Laxman Jagtap & Mahesh Landge
Dhananjay Munde Car Accident: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

आजाराशी झुंज सुरू असताना विधान परिषद आणि त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे रुग्णवाहिकेतून मुंबई येथील विधानभवनात दाखल झाले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्र प्रथम.. नंतर पक्ष आणि शेवटी मी हे पक्षाचे ब्रीद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. संपूर्ण राज्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा राहील, असे कार्य उभं करणारे आमदार जगताप माझ्यासारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांचं आदरस्थान आहेत असेही लांडगे यावेळी सांगितले.

३५ वर्षे त्यांनी शहराच्या राजकारणावर एक वेगळा दबदबा निर्माण केला. गेल्या २० वर्षात शहराच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा शब्द म्हणजे प्रमाण होता. पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, प्राधिकरणाचा परतावा अशा मुद्यांवर त्यांनी तत्कालीन मातब्बर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण, शहरातील प्रश्न सुटत नसतील, तर अशा राजकारणाचा उपयोग काय? अशी सडेतोड भूमिका घेणारे आमदार जगताप हे २०१४ पासून भाजपचे 'डिसिजन मेकर' नेते बनले होते अशीही आठवण लांडगेंनी यावेळी करुन दिली.

Laxman Jagtap & Mahesh Landge
BJP Mission 45 : भाजपचे मिशन 45, मग शिंदे गटाच्या वाट्याला काय?

निवडणुक काळात आमची राम-लक्ष्मणची जोडी अशी घोषणा शहरात खूप लोकप्रिय झाली. पक्षात भाऊंचा नेहमी आधार वाटत होता. आता हा आधार हरपला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वाभिमानासाठी राजकीय लढा उभारणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ही पोकळी कधीही भरुन येणारी नाही. असा कर्तृत्वसंपन्न नेता पुन्हा होणे नाही. एका कर्तृत्वसंपन्न धगधगत्या नेतृत्वाला शहर आज मुकले आहे असे लांडगे भावूक होत म्हणाले.

शहराच्या वाटचालीतील 'लखलखता तारा' म्हणून ज्यांची ओळख अजरामर राहील अशा आमदार जगतापांनी जगाचा निरोप घेतला. पण शहराच्या या स्वाभिमानी सुपूत्राची कारकीर्द पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील असा विश्वासही आमदार महेश लांडगेंनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com