प्रकृतीबद्दलच्या चर्चेवर आमदार जगताप म्हणाले, एकदम फीट अँड फाईन!

आमदार लक्ष्मण जगतापांची प्रकृती बारीक व वजन कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांसून त्याविषयी कुजबूज सुरु झाली होती.
प्रकृतीबद्दलच्या चर्चेवर आमदार जगताप म्हणाले, एकदम फीट अँड फाईन!
bjp mla lakshman jagtap says he is fit and fine

पिंपरी : मी एकदम स्वस्थ म्हणजे फीट असून काळजीचे कसलेही कारण नाही,असे सांगत पिंपरी-चिंचवडचे (Pimpari-Chinchwad) कारभारी व भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वांनाच प्रथमच जाहीरपणे चिंतामुक्त केले. फक्त कोरोना (Covod-19) होऊ नये म्हणून डॉक्टरांनी दक्षता घेण्यास सांगितल्याने कार्यालयात आठवड्यातून एक दिवस भेटत होतो व सार्वजनिक कार्यक्रम काही दिवस टाळत  होतो, असा पहिल्यांदाच खुलासा त्यांनी केला आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीला आमदार जगतापांचे वजन काहीसे वाढले होते. ते त्यांनी डाएट आणि व्यायामाने कमी केले. दरम्यान, पिंपरी महापालिकेत २०१७ ला भाजपची प्रथमच त्यांनी सत्ता आणली. नंतर ते स्वत:ही आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. मात्र, फिटनेस फंड्यातून स्वत:ला फीट ठेवणाऱ्या जगतापांची प्रकृती बारीक व वजन कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांसून त्याविषयी कुजबूज सुरु झाली होती. त्यात ते आठवड्यातून फक्त एकदाच आपल्या कार्यालयात भेटू लागले होते. सार्वजनिक कार्यक्रम,तर त्यांनी जवळपास बंदच केले होते.त्यामुळे त्यांना कसला आजार, तर नाही ना अशा शंका घेण्यात येत होत्या. 

याबाबत आमदार जगताप यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, बंधूंच्या वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेलो होतो. त्यानंतर मला पाच महिने खोकल्याचा त्रास झाला.म्हणून तपासणी केली असता बारीक गाठी घशात झाल्याचे आढळले. औषधोपचारानंतर त्या विरघळून गेल्या. दरम्यान, कोरोना आला होता. तो कुठल्याही परिस्थितीत होऊ देऊ नका,असे डॉक्टरांनी बजावल्याने कार्यालयात जाणे कमी करून सार्वजनिक वावर बंद केला होता. म्हणून मी सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसत होतो.

दरम्यान आपल्या प्रकृतीविषयी अतिशय सजग असणारे आमदार जगताप आपला फिटनेस फंडा सांगताना म्हणाले, मी सर्व प्रकारचे व्यायाम करतो. डाएट फूड घेतो आणि योगाही करतो. इतरांनीही फिट रहावे म्हणून रामदेवबाबांच्या योग शिबिराचेही आय़ोजन करतो. संतुलित व पोषक आहार म्हणून मी डॉ.जगन्नाथ दिक्षित व विश्वंभर चौधरी यांचा डाएट प्लॅन फॉलो करतो आहे. कारण त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या त्यांच्या डाएट प्लॅनच्या परिणामाबाबत सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in