भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश अन् दोन महिन्यांत तीन गुन्हे दाखल!

युवक काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस गणेश गायकवाडविरुद्ध आता खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल आहे.
attempt to murder case registered against congress leader ganesh gaikwad
attempt to murder case registered against congress leader ganesh gaikwad

पिंपरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा (Youth Congress) सरचिटणीस आणि उद्योगपती गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६, रा. एनएसजी हाऊस,आयआयटी रोड,औंध,पुणे)  (Ganesh Gaikwad) याच्याविरुद्ध आता खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आज दाखल झाला. रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्याच्या पत्नीनेच दिली आहे. गणेशविरुद्ध गेल्या १५ दिवसात दाखल झालेला हा तिसरा गंभीर गुन्हा आहे.

पत्नीला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या या गुन्ह्यात गणेशचे वडील उद्योगपती नानासाहेब शंकरराव गायकवाड (वय ७०,रा. सदर) हेसुद्धा आऱोपी आहेत. दोन वर्षापूर्वीची ही घटना आहे. २५ मे ते २४ जून २०१९ दरम्यान हा प्रकार झाला. त्यावेळी गणेशने आपल्या पत्नीला मारहाण करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. नंतर रिव्हॉल्वरमधून तिच्यावर गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार करण्यास गणेशला वडिलांनी प्रवृत्त केल्याने त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. मुख्य आरोपी गणेश मिळून आला नसल्याचे महिला तपासाधिकारी बोरकर यांनी सांगितले.

गणेश गायकवाड हा २०१९ च्या विधानसभेला भाजपकडून इच्छुक होता. त्याने मे महिन्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याला लगेचच पद देण्यात आले होते. नंतर काही दिवसांतच १६ जूनला त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा पहिला गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यात त्याने पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विजय वसंत कुलकर्णी यांची सूस (ता.मुळशी) येथील नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केलेली आहे. 

त्यानंतर आठवड्यात (ता.२४ जून) शहरातील सांगवी या दुसऱ्या पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दरोड्याचा दुसरा गुन्हा नोंद झाला.  ही घटना १७ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान घडलेली आहे. त्यात अजिंक्य विठ्ठल काळभोर या बांधकाम व्यावसायिकाच्या पिंपळे निलख येथील जागेत घुसून त्यांचे काम गणेश व त्याच्या साथीदारांनी बंद पाडले होते. तसेच तेथील ४८ हजाराचा साहित्य धमकावून त्यांनी नेले होते. पुन्हा येथे फिरकलात,तर दहावेळा फायरिंग करेन, असे काळभोरांना त्याने धमकावले होते. पहिल्या गुन्ह्यानंतरच गणेश फरारी झाला असून त्यानंतर त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात तो मिळून येत नसल्याचे सबंधित तपासाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com