
Pimpri Chinchwad News : चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला.मात्र, आमदार होऊन काही तासच उलटले असताना जगताप या 'अॅक्शन मोड'मध्ये आल्या आहेत. त्यांनी वरिष्ठांचं अजून अधिवेशनासाठी निमंत्रण आलं नाही. पण शपथविधी झाला आणि या अधिवेशनात संधी मिळाली की महिलांच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवणार असल्याचं नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी जाहीर केलं आहे.
अश्विनी जगताप(Ashwini Jagtap) यांनी चिंचवड पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जगताप म्हणाल्या, लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर मी काम करणार आहे. आज कार्यालयात आल्यावर माझं सगळ्यांनी स्वागत केलं. भाऊंच्या जागेवर मी काम करणार असल्यानं सगळ्यांनाच आनंद झालेला दिसत आहे. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसांपासून माझ्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांची रांग लागली आहे. फार दिवस अनेकांची रखडलेली कामं आहेत. ती काम आता पूर्ण करायची आहेत असं त्या म्हणाल्या.
तसेच सध्या अधिवेशन सुरु आहे. त्यात महिलांचा मुद्दा लावून धरणार आहे. त्यात अंगणवाडीच्या महिलांना आणि मदतनीसांना वेतन वाढ हवी आहे. सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या महिलांचा मुद्दा अधिवेशनात मांडणार आहे. पण वरिष्ठांचं अजून अधिवेशनासाठी अद्याप निमंत्रण आलेलं नाही. शपथविधी झाला आणि या अधिवेशनात संधी मिळाली तर आवर्जून महिलांच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवणार आहे असंही जगताप यांनी सांगितले.
अश्विनी जगताप म्हणाल्या, दरवेळी लक्ष्मण जगताप यांना मत द्यायचे. मात्र, आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे मला लढावं लागत आहे. माझं मत कायम त्यांना असायचं. आज मीच मला मत दिलं आहे असं म्हणत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावले होते.
जगताप कुटुंबियांनी विजयानंतर भाजप पदाधिकारी स्मृतिस्थळावर जाऊन लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले. यावेळी जगताप कुटुंबीय भावूक झाले होते. पत्नी व विजयी उमेदवार अश्विनी जगताप म्हणाल्या, "हा विजय जनतेला, साहेबांना समर्पित करीत आहे. त्यांनी केलेल्या कामांनाच जनतेनी मते दिली आहेत. यातून जनतेचे लक्ष्मणभाऊंवरील प्रेम कायम असल्याचे दिसून येते. त्यांची आठवण कायम राहील
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.