`अजित पवारांमुळेच पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या जागेचा प्रश्न मिटलाय!` - ajit pawar had solved the issue of land for PCMC court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

`अजित पवारांमुळेच पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या जागेचा प्रश्न मिटलाय!`

उत्तम कुटे
शनिवार, 26 डिसेंबर 2020

अजित पवार यांचे पिंपरीकडे नेहमीच लक्ष राहिले आहे... 

पिंपरी : पिंपरी- चिंचवड  न्यायालयाच्या मालकीच्या नवीन इमारतीसाठी अजित पवार यांनीच प्राधिकरणाची मोशी येथे जागा उपलब्ध करुन दिली आहे. फडणवीस सरकार व पालिकेतील सत्ताधारी भाजपला तेथे इमारत बांधता आली नाही,असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आज केला आहे.

काही तांत्रिक बाबींमुळे सध्याच्या पालिकेच्या भाड्याच्या मोरवाडी येथील अपुऱ्या पडणाऱ्या शहर न्यायालयाचे स्थलांतर पालिकेच्याच नेहरूनगर येथील दुसऱ्या प्रशस्त जागेत होऊ शकले नसल्याचा दावाही वाघेरे यांनी केला आहे. कोरोनामुळे पिंपरीच नाही, तर सर्व राज्यातील नवी विकासकामे थांबली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोनाचे संकट जाताच न्यायालयीन संकुलाचे बांधकाम सुरु होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सध्याची न्यायालयाची जागा अजितदादांमुळे न्यायालयाला मिळालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीच सध्या अडचण आहे. कोरोनामुळे राज्य सरकारचे आर्थिक गणित संकटात सापडले आहे. त्यामुळे आरोग्य, पोलिस अशा महत्वाच्या सेवांसाठी सरकार प्राधान्याने खर्च करत आहे. इतर बाबींच्या खर्चात कपात करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने ते सर्व खात्यांना अशा परिस्थितीत न्याय द्यायचा प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळाने खर्चातील कपात स्वीकारण्यासाठी पाऊल टाकले आहे. त्यामुळे राज्यातील काही प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी विलंब होत आहे. मात्र ही आर्थिक घडी लवकरच सावरण्याची चिन्हे असून त्यासाठी राज्य सरकार पावले टाकत आहे. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांकडे बारीक लक्ष आहे. या नगरीच्या विस्तारात त्यांची भूमिका कायमच महत्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीत ते कुठेच कमी पडणार नाहीत. लवकरच सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने मार्गी लागल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख