Aditya Thackeray : ...तर इतर राज्यात उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला असता !

वेदांत-फॉक्सकॉन या कपंनीचा तळेगाव येथे येणारा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून गेल्या दहा पंधरा दिवसात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

पुणे : राज्यातला पावणेदोन लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प राज्याबाहेर गेला हे राजाच्या उद्योमंत्र्यालाच माहिती नव्हते. औद्योगिक पातळीवर राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. असा प्रकार देशातील इतर कोणत्याही राज्यात झाला असता तर त्या उद्योमंत्र्यांनी राजीनामा दिला असता, या शब्दात शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह राज्य सराकरवर टीका केली आहे.

Aditya Thackeray
Sawant : माझ्या बापाचा फोटो लावू नका म्हणता, मग तुम्ही शिवाजी महाराजांचे फोटो का लावता ?

वेदांत-फॉक्सकॉन या कपंनीचा तळेगाव येथे येणारा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून गेल्या दहा पंधरा दिवसात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्येे यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पाश्‍र्वभूमीवर आज ठाकरे यांनी थेट तळेगावमध्ये येऊन सभा घेतली. तळेगावला झालेल्या सभेत ठाकरे यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली.

Aditya Thackeray
तानाजी सावंतांची जिभ घसरली; टीका करताना उद्धव ठाकरेंची लाज काढली...

ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यात सध्या काय सुरू आहे कळत नाही. कुणाच्या खुर्चीवर कोण बसतंय हेही कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री कोण आहे हेच मुळात अजून कळेनासं झालयं. मुख्यमंत्री रोजच दिल्लीला जात आहेत. त्यांनी दिल्लीला जरूर जावं. मात्र, कधीतरी राज्यातील सामान्य माणसाच्या प्रश्‍नासाठी दिल्लीला जावे.’’

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते तोपर्यंत महाराष्ट्रात होता. सत्ता बदलली आणि तातडीने हा प्रकल्प गुजरातला देण्यात आला. सत्ता कधी येतेय आणि हा प्रकल्प कधी एकदा गुजरातला देतोय असं काहींना झालं असावं त्यामुळेच सत्तेत आल्यानंतर लगेचच हा प्रकल्प गुजरातला देण्यात आला, अशी टीका आमदार ठाकरे यांनी केली.

तुम्हाला सत्तेचं गाजर हवं की रोजगार असा प्रश्‍न आमदार ठाकरे यांनी उपस्थित तरूणांना केला. त्यावर तरूणांनी एकच जल्लोष करत रोजगार हवा असल्याचे सांगितले. हा प्रकल्प गुजरातला जात असताना ४० गद्दार सत्तेत बसले होते, अशी टीका आमदार ठाकरे यांनी केली. त्यावरदेखील उपस्थित तरूणांकडून जोरदार घोषणा देत शिवसेना सोडून गेलेल्या चाळीस गद्दारांचा निषेध अशा घोेषणा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com