AAP News
AAP News Sarkarnama

AAP News : चिंचवड पोटनिवडणुकीत 'आप'ने ठोकला शड्डू,दोन दिवसांत उमेदवार जाहीर करणार

Chinchwad By-Election : पिंपरी-चिंचवडमधील राजकारण हे गावकी भावकीवर चालते...

Pimpri chinchwad Political News : आम आदमी पार्टीची (आप) युती ही जनतेशी असल्याने ती चिंचवड पोटनिवडणुकीत इतर कुठल्या राजकीय पक्षाशी ती करणार नाही.तर, स्वबळावर ही निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाने जाहीर केले.यामुळे सुरवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी ही निवडणूक आताच किमान तिरंगी,तरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

चिंचवडसाठी सहा इच्छूक असून त्यातील एकाची उमेदवारी दोन दिवसांत जाहीर करू,असे `आप`चे प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.चिंचवड लढण्याचा निर्णय़ शहर कार्यालयातील बैठकीत आज घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

AAP News
Satyajeet Tambe: महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळविल्यानंतरही तांबेंचा जल्लोष नाही; काय आहे कारण?

पक्षाचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांसह इतर वरिष्ठ नेते व खासदार चिंचवडच्या प्रचाराला येणार असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनाही त्यासाठी विनंती करणार आहे, असे ते म्हणाले.पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा यावेळी उपस्थित होते.

AAP News
Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

पिंपरी-चिंचवडमधील राजकारण हे गावकी भावकीवर चालते,असे सांगत पण ते संविधानिक चौकटीत चालले पाहिजे,असे राठोड म्हणाले.

दहा वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवलेला आप हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचे सांगत आम्हाला चिल्लर समजणाऱ्या विरोधकांना बेंद्रे यांनी यावेळी सूचक इशारा दिला.कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर राजकारण चालणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये `आप`(AAP)चा रिमोट कंट्रोल हा जनतेकडे असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

तर,आम्ही भावनिक राजकारण करत नसून लोकशाहीत कोणताही मतदारसंघ कुणाची जहागिरी नसतो,असा इशारा किर्दंत यांनी भाजपचे नाव न घेता दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com