राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार! भाजपची टीका...गणरायाला घालणार साकडं

संकटांना घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात महिलांवर अत्याचार सुरु आहेत, अशी टीका भाजपनं केली आहे.
Uma Khapre slams govt over Atrocities against women
Uma Khapre slams govt over Atrocities against women

पिंपरी : संकटांना घाबरून घरात बसलेल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात महिलांवर तालिबानी अत्याचार सुरु आहेत. सरकारच्या दबावामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची पोलिसांत हिंमत राहिलेली नाही, अशी सडेतोड टीका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी गुरुवारी (ता.९) केली. या अत्याचाराविरोधातील संघर्षात महिलांना बळ दे, असे साकडे सरकारी दडपशाहीमुळे बंद असलेल्या मंदिरासमोर जाऊन श्रीगणेशाच्या चरणी घालण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या. (Uma Khapre slams govt over Atrocities against women)

महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. तर, इकडे राज्यात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस झाला आहे, असा हल्लाबोल खापरे यांनी केला. त्याची उदाहरणे सांगताना त्या म्हणाल्या, पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी व २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला. याव्दारे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाही निष्क्रीय ठाकरे सरकार मात्र घरात बसून आहे, असं खापरे म्हणाल्या.

पुरोगामी महाराष्ट्रात वानवडी येथील गौरी गायकवाड नावाच्या महिला सरपंचास सताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्यानंतरही कारवाई होत नाही. औरंगाबादला उसतोड मजूर महिलेचे अपहरण केले जाते आणि सरकार मात्र हातावर हात ठेवून ढिम्म राहते. ठाण्यात पालिकेच्या अधिकारी महिलेवर भर रस्त्यात हल्ला करून तिची बोटे छाटली जातात. अशारितीने महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीका खापरे यांनी केली.

कोरोनाकाळात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांवरही अत्याचार झाले असून अशा वाढत्या घटनांमुळे महिलांनी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटू लागली आहे. जनतेने घरात बसावे अशी ठाकरे सरकारची इच्छा असली तरी त्यासाठी रस्त्यावरील गुन्हेगारीस पाठीशी घालून दहशत माजविणे हा मार्ग नाही. गणरायाच्या थेट मुखदर्शनावरही बंदी घालणारे ठाकरे सरकार सण आणि उत्सवांचा तिरस्कार करते हे सिद्ध झाले आहे. घरात बसून स्वतःचे तोंड लपविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा देवाच्या मुखदर्शनाला विरोध का, असा सवालही खापरे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com