जायंट किलर खासदार - श्रीरंग बारणे

श्रीरंग बारणे हे मावळचे शिवसेना खासदार आहेत. या मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा २०१९ ला निवडून आले आहेत. २०१४ ला त्यांनी चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता.तर, २०१९ ला ते जायंट किलर ठरले. त्यांनी पवार कुटुंबातील सदस्य अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा २,१५,९१३ एवढ्या मतांनी पराभव केला
जायंट किलर खासदार - श्रीरंग बारणे
Shrirang Barane Birthday

श्रीरंग बारणे हे मावळचे शिवसेना खासदार आहेत. या मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा २०१९ ला निवडून आले आहेत. २०१४ ला त्यांनी चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता.तर, २०१९ ला ते जायंट किलर ठरले. त्यांनी पवार कुटुंबातील सदस्य अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा २,१५,९१३ एवढ्या मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांचे शिवसेनेत वजन एकदम वाढले. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटच्या वर्तुळात गेले. २०१९ मधील या मोठ्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींनी त्यांचे खास अभिनंदन केले. या विजयाचे बक्षीस म्हणून की काय त्यांची वित्त या सर्वात महत्वाच्या संसदेच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. 

गत टर्ममध्येही ते संरक्षण विभागाची स्थायी समिती, रस्ते वाहतूक आणि सल्लागार समितीचे सदस्य होते. २५ वर्षे ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषविलेले आहे. पूर्वी ते कॉंग्रेसमध्ये होते. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसदरत्न हा पुरस्कार सलग पाच वर्ष मिळाला. तो पाच वर्षे मिळाल्याने दुसऱ्या टर्मला ते गतवर्षी महासंसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतात. त्यामुळे ते तथा मावळचे खासदार हे पिंपरी-चिंचवडचेही खासदार म्हणून ओळखले जातात.

अप्पा म्हणून ते परिचित आहेत.त्यांचा मतदारसंघ घाटावर आणि घाटाखाली विभागलेला असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांची संपर्क कार्यालये आहेत. शब्दवेध, समर्थ लढवय्या आणि मी अनुभवलेली संसद अशी त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.अनेक देश ते फिरले आहेत. बुद्धीबळ,क्रिकेट, व्हॉलीबॉल,टेनिस आणि बॅडमिंटन या खेळाची त्यांना आवड आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेच्या फेब्रुवारी २०२२ ला होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीत सध्या ते व्यस्त आहेत. त्यासाठी त्यानी शिवसेना मिशन २०२२ सुरु केले असून त्याअंतर्गत त्यांनी प्रभागनिहाय बैठकांचा सध्या धडाका लावला आहे. तूर्त, पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in