राफेल खरेदी आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा : पृथ्वीराज चव्हाण

राफेल खरेदी आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा : पृथ्वीराज चव्हाण

विमान खरेदीत केंद्राने 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून तो जागतिक स्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता.21) पिंपरी चिंचवड येथे केला.

पिंपरीः विमान खरेदीत केंद्राने 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असून तो जागतिक स्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता.21) पिंपरी चिंचवड येथे केला. या मोदी सरकारने मोदी सरकारने साडेचार वर्षाच्या काळात 21 लाख कोटींपेक्षा अधिक कर जमा केला. मात्र, त्यानंतरही जनतेला अच्छे दिन पहायला मिळाले नाहीत, असेही ते म्हणाले. 

केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून त्यामुळे महाराष्ट्राचा विकासदर पिछाडीवर असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे केल्यानंतर ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार शरद रणपिसे, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, श्यामला सोनवणे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, सध्या देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून जात आहे. रुपयाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. डॉलरच्या तुलनेत तो सतत पिछाडीवर जात आहे. गेल्या चार वर्षांत 48 हजार कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे. प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची थकीत कर्जे वाढत चालली आहेत. त्यातच आयएफएलएसचा आर्थिक घोटाळा समोर आला असून त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 

युपीएच्या कार्यकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 47 होती ती ऑक्टो. 2018 मध्ये 73 रुपयांवर आली असून रुपयाचा हा निचांक आहे. भारतीय चलनाची किंमत घटल्यामुळे आयात महाग झाली आहे. तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ही वारेमाप वाढ झाली आहे. युपीएच्या सत्ताकाळात आयात आणि व्हॅट 25 टक्के होता. तो आता 39 टक्के आकारला जातो. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्ज माफ केल्याचे जाहीर केले. परंतु, अद्याप शेतक-यांचे कर्ज माफ  झालेले नाही. सिडकोचा जमीन व्यवहार आणि प्रकाश मेहता यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. येत्या निवडणुकीत या सर्व  प्रश्‍नांची उत्तरे सत्ताधा-यांना द्यावीच लागतील. सरकारचा भ्रष्ट कारभार जनता पाहत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तो जनतेच्या समोर मांडावा, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com