महेश लांडगे पुन्हा आमदार झाले आणि दत्ताकाकांची शेंडी कायम राहिली

पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पु्न्हा आमदार झाल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांना आता शेंडी कापता येणार नाही. वा तिची गाठही बांधता येणार नाही. कारण लांडगेंना पराभूत केल्याशिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा विधानसभा निवडणुकीपूर्वी ४ जुलैला विरोधी पक्षनेतेपदी असताना दत्ताकाकांनी केली होती.
Mahesh Landge - Datta Sane
Mahesh Landge - Datta Sane

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पु्न्हा आमदार झाल्याने पिंपरी-चिंचवड पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांना आता शेंडी  कापता येणार नाही. वा तिची गाठही बांधता येणार नाही. कारण लांडगेंना पराभूत केल्याशिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा विधानसभा निवडणुकीपूर्वी ४ जुलैला विरोधी पक्षनेतेपदी असताना दत्ताकाकांनी केली होती.

यावेळी लांडगेंना पराभूत केले नाही, तर पुढच्यावेळी करेन, पण शेंडी कापणार नाही,असा निर्धार सानेंनी गेल्यावर्षी केला होता. महेशंनी आपल्या 'पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट'च्या धोरणानुसार काकांच्या या प्रतिज्ञेला उत्तर दिले नव्हते.  मात्र, त्यांचे समर्थक व महापौर राहुल जाधव यांनी ''गरजनेवाले बरसते नही. साने हे लांडगेंविरुद्ध अर्ज भरणारच नाहीत. फक्त निवडणुकीत वातावरण निर्मिती करणे त्यांचा स्वभाव आहे. कुणी कितीही डरकाळ्या फोडल्या,तरी लांडगे हे पुन्हा आमदार होणारच आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. त्यामुळे काकांना शेंडी ठेवावीच लागणार आहे,'' असे त्यावेळी सांगितले होते.

त्यांचे हे वक्तव्य नंतर खरे ठरले. काका भोसरीतून प्रबळ दावेदार होते. त्यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्जही दिला होता. मात्र, त्यांनाच नाही, तर इतर कुणालाही उमेदवारी न देता भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष विलास लांडे यांना पक्षाने पुरस्कृत केले होते. मात्र, त्यांचा लांडगेंनी पाऊण लाखापेक्षाही अधिक मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे दत्ताकाकांची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. दरम्यान, आपल्या कार्यालयावरील हल्यामागील सूत्रधार पकडला न गेल्याने शहर पोलिस आयुक्तालय कार्यालयासमोरच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दत्ताकाकांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com