`राष्ट्रवादी'कडून विधानसभेसाठी पिंपरी-चिंचवडची उद्या चाचपणी 

लोकसभेतील पराभवाची विधानसभेला पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस आतापासून कामाला लागली आहे.जिल्हानिहाय आढावा बैठका सत्र सुरु केले आहे. त्यात पिंपरी-चिंचवडची चाचपणी उद्या (ता.15) मुंबईत पक्षाच्या राज्य कार्यालयात खुद्द शरद पवार हे करणार आहेत. यावेळी मावळमधून लोकसभेला पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार पार्थ पवार व शिरूरमधील विजयी झालेले डॉ. अमोल कोल्हे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
`राष्ट्रवादी'कडून विधानसभेसाठी पिंपरी-चिंचवडची उद्या चाचपणी 

पिंपरीः लोकसभेतील पराभवाची विधानसभेला पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस आतापासून कामाला लागली आहे.जिल्हानिहाय आढावा बैठका सत्र सुरु केले आहे. त्यात पिंपरी-चिंचवडची चाचपणी उद्या (ता.15) मुंबईत पक्षाच्या राज्य कार्यालयात खुद्द शरद पवार हे करणार आहेत. यावेळी मावळमधून लोकसभेला पराभूत झालेले पक्षाचे उमेदवार पार्थ पवार व शिरूरमधील विजयी झालेले डॉ. अमोल कोल्हे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

लोकसभेला तोंड पोळल्याने विधानसभेला ताकही फुंकून पिण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे.त्यामुळे या निवडणुकीला चार महिने अवकाश असतानाच त्यांनी राज्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा जिल्हानिहाय घेणे सुरु कले आहे. त्याअंतर्गत पक्षाच्या पिंपरी-चिंचवड जिल्ह्याची बैठक मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील मुख्यालयात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. तिला एक खासदार (डॉ.कोल्हे), आमदार नसल्याने दोन माजी आमदार (भोसरीचे विलास लांडे), पिंपरीचे अण्णा बनसोडे), सर्व नगरसेवक, जिल्हाध्यक्ष (संजोग वाघेरे-पाटील),सरचिटणीस (फजल शेख),सर्व माजी महापौर,उपमहापौर,नगरसेवक यांच्याजोडीने पार्थ यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.विधानसभा इच्छूकांच्या चाचपणीसह या निवडणुकीची रणनितीही यावेळी ठरविली जाणार आहे.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड शहरात आहेत.आघाडीत ते राष्ट्रवादीकडेच आहेत.विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच पवार यांनी नुकतेच शहरात केले आहे. त्यामुळे जुन्यांऐवजी नव्यांना हुरूप आला आहे. त्यामुळे ते तयारीत आहेत. आमंत्रितांतच हे विधानसभेचे इच्छूक आहेत. 

भोसरीत राष्ट्रवादीकडे विद्यमान आमदार व भाजपचे सहयोगी सदस्य पैलवान महेश लांडगे यांना पुरुन उरेल असा दमदार इच्छूक आहे. भोसरीचे पहिले आमदार (लांडे) हे पक्षाचेच होते. तेथे पुन्हा घड्याळाची टिकटिक ऐकायला येईल,असा पक्षाला विश्वास आहे.मात्र, चिंचवडमध्ये दमदार उमेदवाराची वानवा आहे. तेथील भाऊबली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासमोर तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीला लोकसभेला शिरूरला खेळलेले कार्ड पुन्हा उपसावे लागणार आहे. 

पिंपरीत इच्छूकांची मांदियाळी आहे. तेथेही पहिले आमदार (बनसोडे) राष्ट्रवादीचेच होते. आता पुन्हा आमदार होण्यासाठी पोषक  वातावरण तेथे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com