अभिनेत्री खासदार रेखा यांच्या 3 कोटींच्या निधीतून पिंपरीत उभारली जाणार शाळा - Pimpri Chinchwad MP Rekha School | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

अभिनेत्री खासदार रेखा यांच्या 3 कोटींच्या निधीतून पिंपरीत उभारली जाणार शाळा

उत्तम कुटे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

अभिनेत्री खासदार रेखा गणेशन यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये एक शाळा उभी राहणार आहे. 14 कोटी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड महापालिका 'पीपीपी मॉडेल'ची ही शाळा बांधणार असून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

पिंपरी : अभिनेत्री खासदार रेखा गणेशन यांनी दिलेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये एक शाळा उभी राहणार आहे. 14 कोटी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड महापालिका 'पीपीपी मॉडेल'ची ही शाळा बांधणार असून इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

या शाळेचे भुमीपूजन याच महिन्यात होऊ घातले आहे. त्याला रेखा येणार नाहीत. मात्र, शाळेच्या उदघाटनाला येण्याचे त्यांनी कबूल केले आहे. या शाळेसाठी रेखा यांनी दिलेले तीन कोटी रुपये ही चित्रपटाची एक कहाणीच आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेत पूर्वीचे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळात रेखा यांच्याकडे दोन कोटी रुपये या शाळेसाठी प्रशासनाने मागितले होते. पण त्याचा पाठपुरावाच करण्यात आला नाही. त्यामुळे ते मागणीपत्र अडगळीत पडले. गेल्या वर्षी पालिकेत सत्तापालट झाला. भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादी विरोधी बाकावर गेली. 

त्यांच्या शाम लांडे या नगरसेवकाच्या हाती हे पत्र लागले. त्यांनी त्याचा पुन्हा जोमाने पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून रेखा यांनी दोन नव्हे, तर तीन कोटी रुपये देऊ केले आहेत. लांडे यांच्या प्रभागातच ही सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा उभी राहत आहे. या पाच मजली शाळेत प्रत्येक मजल्यावर मुले,मुली आणि शिक्षक यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणार आहे. तसेच ई लर्निंगसह सर्व सुविधाही असतील. पैशांअभावी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकणाऱ्या पालकांची या शाळेमुळे मोठी सोय होणार असून त्यांच्या पाल्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण आता मोफत मिळेल, असे लांडे म्हणाले.

आकांक्षा संस्था आणि पिंपरी पालिकेच्या वतीने ही शाळा उभारली जात आहे. कासारवाडी येथील छत्रपती शाहूमहाराज विद्यामंदिर या पालिकेच्या मराठी शाळेशेजारी ही नवी इंग्रजीची 'पीपीपी मॉडेल'ची शाळा उभी राहत आहे. शाळा इमारत मुलांना दप्तर, पुस्तके आदी सुविधा पालिका पुरविणार आहे. तर, शिक्षणाची बाजू 'आकांक्षा' सांभाळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख