पिंपरी-चिंचवडच्या मौनी `स्थायी' अध्यक्षांमुळे महापौरांभोवती सत्ताकेंद्र

श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताकेंद्रात दुसऱ्या वर्षी बदल झाला आहे. पहिल्या वर्षी हेडमास्तरसारखा कडक कारभार करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या हातात पालिकेची सत्ता होती. मात्र, दुसऱ्या वर्षी स्थायी अध्यक्ष मौनी लाभल्याने सत्ताकेंद्र बदलले असून ते महापौरांकडे गेले आहे. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची आल्याने कारभारात फरक पडणारच होता मात्र,एकाच पक्षाची सत्ता असूनही कारभारात हा टोकाचा बदल झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या मौनी `स्थायी' अध्यक्षांमुळे महापौरांभोवती सत्ताकेंद्र

पिंपरी : श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताकेंद्रात  दुसऱ्या वर्षी बदल झाला आहे. पहिल्या वर्षी हेडमास्तरसारखा कडक कारभार करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या हातात पालिकेची सत्ता होती. मात्र, दुसऱ्या वर्षी स्थायी अध्यक्ष मौनी लाभल्याने सत्ताकेंद्र बदलले असून  ते महापौरांकडे गेले  आहे. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची आल्याने कारभारात फरक पडणारच होता  मात्र,एकाच पक्षाची सत्ता असूनही कारभारात हा टोकाचा बदल झाल्याने तो चर्चेचा  विषय झाला आहे.

पूर्वीच्या म्हणजे भाजपच्या पहिल्या स्थायीच्या अध्यक्षा या शहर कारभाऱ्यांच्या कट्टर पाठीराख्या होत्या. तर, भाजपचे पहिले महापौर हे शहराच्या उपकारभाऱ्यांचे खंदे समर्थक होते. मात्र, त्यांचा शांत, मितभाषी स्वभाव होता. स्थायी अध्यक्षांचा त्याउलट होता.परिणामी पालिकेच्या पहिल्या वर्षी कारभारावर स्थायी अध्यक्षांची छाप होती. पालिका प्रशासनात त्यांनी शिस्त आणली होती.दुसऱ्या वर्षी नेमके उलट चित्र आहे.उपकारभारी समर्थक असलेले महापौर आक्रमक आणि तेवढेच अँक्टिव्ह  आहेत. तर,स्थायी अध्यक्षा एकदम त्याविरुद्ध स्वभावाच्या आहेत.परिणामी स्थायीची बागडौर त्यांचे माजी नगरसेवक पती व स्थायीचे एक ज्येष्ठ सदस्य हाकत आहे. त्यांनी त्यासाठी स्थायीच्या कारभाराची खडानखडा माहिती असलेल्या स्थायीच्या एका रिटायर्ड कर्मचाऱ्याची मदतही घेतली आहे. त्यामुळे या माजी नगरसेवक आणि कर्मचाऱ्याचा पालिकेतच नव्हे, तर स्थायीच्या अँटी चेंबरपर्यंत निर्धोक वावर असतो. अधिकाऱ्यांना ते भेटतात. त्याचे कुणाला वावगेही वाटत नाही.

पालिका खजिन्याची चावी असलेल्या स्थायी अध्यक्ष मौनी असल्या, तरी त्यांचे अनुभवी पती, शहर कारभाऱ्यांचे विश्वासू असलेल्या माजी नगरसेवकामुळे या स्थायीनेही दोन हजार रुपयांचे विषय वर्षात मंजूर करण्याचा धडाका पहिल्या स्थायीप्रमाणे कायम ठेवला, हे विशेष. त्यासाठी ज्येष्ठ स्थायी सदस्याची मोलाची साथ मिळाली. स्थायीच्या बैठका घेऊन नंतर ब्रिफिंगही तेच करीत आहेत. त्यामुळे खरे अध्यक्ष कोण अशी चर्चा दर आठवड्यात स्थायीच्या साप्ताहिक बैठकीनंतर पालिकेत ऐकायला मिळते.

दरम्यान, मौनी स्थायी अध्यक्षांमुळे आक्रमक, तरुण तडफदार महापौरांकडे सत्ताकेंद्र यावर्षी गेले आहे. प्रत्येक बाबीत त्यांचे लक्ष असते. तसेच ते अॅक्टिव्हसुद्धा आहेत. प्रथमच एखाद्या महापौरांनी शहरातील सर्व पालिका शाळा व स्मशानभूमींची पाहणी केली आहे. पहिल्या वर्षी स्थायी अध्यक्षांशिवाय पालिकेतील पान हलत नव्हते. तीच स्थिती दुसऱ्या वर्षी आहे. फक्त हे पान महापौरांशिवाय हलत नाही, हे चित्र आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com