पिंपरीत महापौरपदासाठी इच्छुकांची मांदियाळी; उपमहापौरपदासाठी विचारेना कुणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (ता.२२) होत असली,तरी नवे महापौर व उपमहापौर कोण होणार हे आजच (ता.१८) स्पष्ट होणार आहे. कारण त्याकरिता अर्ज दाखल होणार आहेत. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्यांचाकडेच ही दोन्ही पदे जाणार हे निश्चीत आहे.
Pimpri Chinchwad Mayor Election on Friday
Pimpri Chinchwad Mayor Election on Friday

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (ता.२२) होत असली,तरी नवे महापौर व उपमहापौर कोण होणार हे आजच (ता.१८) स्पष्ट होणार आहे. कारण त्याकरिता अर्ज दाखल होणार आहेत. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्यांचाकडेच ही दोन्ही पदे जाणार हे निश्चीत आहे. दरम्यान,भाजप व प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीत महापौरपदासाठी मोठी चुरस असल्याने दोघांचेही उमेदवार आजपर्यंत ठरलेले नव्हते. ते उद्याच ऐनवेळी दोन्ही पक्षांचे दादा (भाजपचे चंद्रकांतदादा,तर राष्ट्रवादीचे अजितदादा)निश्चीत करणार असून अर्ज  दाखल करतेवेळीच ते कोण हे समजणार आहे. दुसरीकडे, उपमहापौरपदाकरिता अजिबात चुरस नसून राष्ट्रवादीकडून एकच इच्छुक आहे.तर, भाजपमध्ये कुणाचेही नाव चर्चेत नाही.

यावेळी राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाल्याने त्यांनी ही निवडणूक अधिक जोमाने लढण्याचे ठरविले आहे. त्यातूनच त्यांच्याकडे या पदासाठी चुरस दिसून आली आहे. तिघांनी इच्छूक म्हणून अर्ज दिले आहेत. त्यातील वैशाली काळभोर यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. तर, भाजपकडून झामा बारणे यांच्यानंतर आता माई ढोरे या ज्येष्ठ नगरसेविकेचेही नाव पुढे आले आहे. महापौरपद हे खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाल्याने सत्ताधारी भाजपसह विरोधी राष्ट्रवादीतही त्यासाठी मोठी चुरस आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचा उमेदवारीचा निर्णय हा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर होणार आहे. भाजपचा उमेदवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे,तर राष्ट्रवादीचा अजितदादा पवार हे निश्चीत करणार आहेत. 
चंद्रकांतदादा हे संघटनात्मक बैठकीसाठी शहरात येत आहेत. त्यावेळी महापौरपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊन निर्णय़ होणार आहे. कारण दुपारी लगेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायचा आहे. महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये त्यासाठी यावेळी मोठी चुरस दिसून आली आहे. कारण या गटातील पक्षाच्या तब्बल  २१ नगररसेविका आहेत. सध्या महापौरपद शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे आहे.आता ते चिंचवड मतदारसंघाकडे जाणार आहे. बारणे व ढोरे या दोघीही याच मतदारसंघातील आहेत.

सध्या पिंपरीचे महापौर व उपमहापौरही पुरुष आहेत. आता महापौरपद महिला ओपनसाठी राखीव झाल्याने महिला महापौर होणार आहेत. तर, उपमहापौर,मात्र पुन्हा पुरुषच राहण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, महापौरपदासाठी मोठी चुरस असताना उपमहापौरपदाकरिता ती अजिबात दिसून आलेली नाही. विरोधी राष्ट्रवादीकडूनही फक्त एकच इच्छूक या पदासाठी आहेत. दुसरीकडे महापौरपदासाठी भाजरपमध्य़े चढाओढ दिसून आली आहे. त्याचवेळी उपमहापौरपदासाठी मात्र कुणी पुढे आलेले नाही,हे विशेष. सध्या हे पद चिंचवडकडे आहे. आता ते भोसरीकडे येईल. एकूणच महापौर आणि उपमहापौरपदाची अदलाबदल भोसरी व चिंचवडमध्ये होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com