pimpri-chinchwad ex-mayor nitin kalaje says, he will do as per Mahesh Landge's wish  | Sarkarnama

महापौरानंतर आता पुढे काय? दादा म्हणतील ते : नितीन काळजे  

उत्तम कुटे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पिंपरीः महापौरानंतर आता पुढे काय करणार? सभागृहनेते होणार का? 2019 ला भोसरीतून आमदारकी लढणार का? या तिन्ही प्रश्नांना पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचे एकच उत्तर होते. ते म्हणजे दादा (भोसरीचे अपक्ष आमदार आणि भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे) म्हणतील, तसे. यातून भोसरीतील राजकीय घडामोडी दादांशिवाय होत नाहीत हे स्पष्ट झाले. तसेच यातून काळजे यांची दादांप्रतीची एकनिष्ठताही दिसून आली.

गेल्यावर्षी भाजप पिंपरी पालिकेत प्रथमच सत्तेत आली व काळजे हे पक्षाचे पहिले आणि शहराचे 24 वे महापौर झाले. समाविष्ट गावातील ते पहिले महापौर ठरले. गेल्या महिन्यात (ता.24) त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी पुन्हा दादा समर्थकच राहूल जाधव महापौर झाले. ते सुद्धा समाविष्ट गावातील आहेत. काळजे यांनी पदभार सोडल्यानंतर दोन आठवड्यांनी आज (ता.10) आपल्या कामगिरीचा लेखाजोगा सादर केला. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. दादा हे काळजेंचे गुरुतुल्य मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी एकही शब्द वाकडा जाणार नाही, याची ते पुरेपूर खबरदारी घेत असल्याचे दिसून आले.
 
16 महिने 14 दिवसांच्या कारकिर्दीत काळजेंनी चार हजार कार्यक्रमांना हजेरी लावली. म्हणजे दररोज सरासरी आठ कार्यक्रमांना ते उपस्थित राहत होते. या कालावधीत त्यांनी साडेपाचशे रुग्णांना 27 लाख रुपये आर्थिक मदत महापौर निधीतून केली आहे. याखेरीज समाविष्ट गावात आठशे कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरु केली आहेत. त्यात दुसरेही महापौर समाविष्ट गावातील झाल्याने भविष्यात या गावांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्याची तरतूद करण्याचे काम, मात्र अपुरे राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या कारकिर्दीविषयी समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख