भाऊ आणि दादा समर्थकात उमेदवारीनंतर आता रिपोर्ट कार्डची शर्यत 

प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने आपल्या विशेष कामगिरी न करताही आपल्या पहिल्या वर्षपूर्तीचे रिपोर्ट कार्ड जाहीररित्या काल समारंभपूर्वक काल सादर केले. 2019 च्या तयारीचा एक भाग म्हणून ते प्रेझेंट करण्यात आले.
PCMC leaders
PCMC leaders

पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन टर्म सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने आपल्या कारभाराचा अहवाल कधी दिला नव्हता. काम करूनही त्याची प्रसिद्धी घेण्यात ते कमीच पडले होते.मात्र,प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने आपल्या विशेष कामगिरी न करताही आपल्या पहिल्या वर्षपूर्तीचे रिपोर्ट कार्ड जाहीररित्या काल समारंभपूर्वक काल सादर केले. 2019 च्या तयारीचा एक भाग म्हणून ते प्रेझेंट करण्यात आले. 

गेल्या वर्षभरातील कारभारावर झालेल्या आरोपांवर मलमपट्टी या कार्य अहवालाव्दारे करण्याचा सत्ताधाऱयांचा  हेतूही यामागे असल्याची चर्चा आहे.दरम्यान,यानिमित्त शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांचे समर्थक आणि उपकारभारी आमदार महेशदादा लांडगे यांच्या समर्थकांत उमेदवारीनंतर आता कार्य अहवाल सादर करण्याची शर्यत लागली आहे.

शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेतील आपल्या वर्षभरातील कामगिरी काल सांगितली.त्याचे सादरीकरण सभागृहनेते एकनाथ पवार यांनी केले. हे दोघेही अनुक्रमे 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेचे भाजपचे संभाव्य प्रबळ दावेदार आहेत. जगताप तथा भाऊ हे मावळमधून,तर पवार हे भोसरीतून इच्छूक आहेत.पक्षाच्या एकसंध कामगिरीचा अहवाल दिल्यानंतर आता पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या 2019 च्या इतर विधानसभा इच्छूकांनीही तो देण्याची तयारी सुरु केली आहे. 

कालचा पक्षाचा अहवाल हा आपल्याच कामगिरीचा असल्याचे सभागृहनेते मानत आहेत.सभागृह नेते म्हणून पवार यांची कामगिरी सभागृहात अजून छाप पाडणारी झालेली नाही.त्यामुळे आपला वेगळा अहवाल ते देण्याची शक्यता नाही.सभागृहाबाहेर मात्र,ते भलचेच अॅक्टिव्ह असतात.त्यांच्या कालच्या सादरीकरणानंतर आता शहराचे पहिले नागरिक व भाजपचे पहिले महापौर असलेले नितीन काळजेही आता आपली कामगिरी मांडणार आहेत.महापौर हे शोभेचे अकार्यकारी पद असल्याने ते आपल्या कामगिरीचा अहवाल काय देतात,याकडे देतात,याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

2019 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.त्याबरोबरच विधानसभा झाली,तर दुसऱ्या वर्षातील कामगिरीचा अहवाल आचारसंहितेमुळे प्रसिद्ध करणे या दोन्ही निवडणुकीतील इच्छुकांना शक्य होणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप संभाव्य उमेदवार आहेत.त्यामुळेच त्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाही मुंबईला न जाता आपल्या पक्षाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पहिल्या वर्षाच्या कामगिरीचा अहवाल काल येथे सादर केला. त्याचे सादरीकरण त्यांचे समर्थक आणि सभागृहनेते एकनाथ पवार यांनी केले.ते सुद्धा भोसरी या शहरातील विधानसभा मतदारसंघातील संभाव्य दावेदार आहेत.तर, आता भोसरीतूनच इ्च्छूक असलेले स्थानिक आमदार महेश लांडगे यांचे समर्थक महापौर काळजे हे सुद्धा कार्य अहवाल देणार आहेत.

पालिकेच्या खजिन्याची चावी म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष. हे एक नंबरचे कार्यकारी पद आहे.त्यांची रेकॉर्डब्रेक कामगिरी वर्षभरात झाली. 
मात्र,त्यांचे काही निर्णय वादात सापडले.त्याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी गेल्या.त्यात चौकशी लागली.तर, कचरा गोळा करून त्याची वाहतूक करण्याचे आपल्या सत्ताकालावधीपुरतेच नाही,तर त्यापलिकडेही म्हणजे आठ वर्षासाठी स्थायीने दिलेले पाचशे कोटी रुपयांचे कामही मुख्यमंत्र्यांनीच थांबविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे स्थायी अध्यक्ष विधानसभेच्या इच्छूक असूनही त्यांनी आपले रिपोर्ट कार्ड देता आले नाही.इतर पदाधिकारी,मात्र ते देत आहेत,हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com