pimpri-chinchwad-congress-shakti-app | Sarkarnama

भाजपच्या खोट्या प्रचाराला कॉंग्रेसचे शक्तीअॅपव्दारे उत्तर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसने आता काळाबरोबर बदलायचे ठरविले आहे. भाजपच्या अत्याधुनिक प्रचार यंत्रणेला कॉंग्रेसही आता तसेच उत्तर देणार आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शक्ती अॅप तयार केले आहे. त्याव्दारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले जाईल, असे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून पक्षाचे विचार नागरिकांपर्यंतही पोचविले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पिंपरीः सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसने आता काळाबरोबर बदलायचे ठरविले आहे. भाजपच्या अत्याधुनिक प्रचार यंत्रणेला कॉंग्रेसही आता तसेच उत्तर देणार आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शक्ती अॅप तयार केले आहे. त्याव्दारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले जाईल, असे पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून पक्षाचे विचार नागरिकांपर्यंतही पोचविले जाणार असल्याचे ते म्हणाले.

शहर काँग्रेसच्या वतीने या प्रोजेक्ट शक्ती अॅपचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा नुकताच झाला. यावेळी साठे बोलत होते. राष्ट्रीय सेवादलाचे सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, संयोजक व भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, उमेश खंदारे आदी यावेळी उपस्थित होते.

साठे म्हणाले, “या अॅपव्दारे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी थेट संपर्क साधता येईल. काँग्रेसची ध्येय धोरणे, चालू घडामोडींवरील पक्षाची अधिकृत भूमिका यातून सोप्या पध्दतीने नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी प्रोजेक्ट शक्ती अॅपशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या मोबाईलवरुन 8828843010 या क्रमांकावर आपला मतदार ओळखपत्र क्रमांक मेसेज करावा. यानंतर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी आपल्याला कनेक्ट होता येईल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख