पिंपरी-चिंचवड भाजप अध्यक्षपदासाठी  सचिन पटवर्धन फ्रंट रनर ?  

पिंपरी-चिंचवड भाजप अध्यक्षपदासाठी  सचिन पटवर्धन फ्रंट रनर ?  

पिंपरीःपुणे ग्रामीणनंतर पुणे शहर अध्यक्षपदाचीही भाजपने सोमवारी घोषणा केल्याने आता पिंपरी-चिंचवडलाही नव्या भाजप अध्यक्षांचे वेध लागले आहेत.

लवकरच ही घोषणा गुरुवारी होणार असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनुभवी व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

पुणे ग्रामीणचे भाजप अध्यक्ष बाळा ऊर्फ संजय भेगडे हे आमदार आहेत.ते राज्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडील अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने काढून घेतली. त्यांच्याऐवजी त्यांच्याच भावकीतील गणेश भेगडेंना अध्यक्षपद देण्यात आले. 

तर,पुण्यात नवे अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांना केले गेले.पिंपरी-चिंचवडमध्येही आमदार असलेले लक्ष्मणभाऊ जगताप अध्यक्ष आहेत. त्यांची टर्म संपली आहे.त्यामुळे नव्या अध्यक्षांचे वेध पक्षाच्या शहर शाखेला लागले आहेत.

त्यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड.सचिन पटवर्धन यांचे नाव त्यात पुढे आले आहे. त्यांच्या नावावरच येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होईल,अशी चिन्हे आहेत.

दुसरीकडे माजी नगरसेवक राजू दूर्गे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस व राज्य माथाडी  महामंडळ सल्लागार सदस्य अनूप मोरे यांनी यापूर्वीच आपण शहर अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या जोडीने शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात यांचीही नावे अगोदरच चर्चेत आलेली आहे. जगताप हे विधानसभेची निवडणूक पुन्हा लढविणार असल्याने त्यांना अध्यक्षपदाच्या  जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com