दादा, भाऊ की बाळा कोण होणार राज्यात मंत्री : पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाची आशा

Bala Bhegde Mahesh Landge Laxman Jagtap
Bala Bhegde Mahesh Landge Laxman Jagtap

पिंपरी : राज्य मंत्रीमंडळ विस्तार चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गेले वर्षभर शहरवासीयांना ती आशा लागली आहे. मंत्रीपदाची संधी मिळेल, असे त्यांना वाटत आहे. मात्र, आता,तरी ती मिळणार का की ते आशेचे गाजरच ठरणार हे पुढील महिन्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. मंत्रीपद मिळेल का आणि मिळाले तर दादा, भाऊ की बाळा यांना मिळेल, याचीही चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या वर्षभरात मंत्रीमंडळ विस्ताराच्या अनेक वावटळी आल्या. त्या शमल्या आणि पिंपरीकर मंत्रीपदापासून दूरच राहिले. शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि तरुण आमदार महेश लांडगे मंत्री होतील, ही आशा दरवेळी वाटूनही प्रत्येकवेळी त्यांना निराश व्हावे लागले होते. त्यामुळे नंतर, त्यांनी ही आशाच सोडून दिली होती. दुसरीकडे त्यासाठीचे इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मात्र आशा सोडलेली नव्हती. त्यात शेवटचे दोन महिने तरी शहराला मंत्रीपद मिळेल, असा विश्वास खुद्द जगताप यांनी व्यक्त केल्याने ती कायम राहिली होती. त्यामुळे येत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्याहून आल्यानंतर पावसाळी अधिवेशनापूर्वी (जुलै) हा मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी जोरदार आवई पुन्हा उठली आहे. ती यावेळी यापूर्वीसारखी आवईच ठरू नये, असे जगपा आणि लांडगे या दोघांच्या हितचिंतकांना वाटत आहे.

उद्योगनगरीतील राष्ट्रवादीची 15 वर्षाची सत्ता उलथवून येथील पालिकेत सव्वा वर्षापूर्वी प्रथमच भाजप सत्तेत आली. त्यात दादा आणि भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळेल, असे आश्वासन खु्द्द मुख्यमत्र्यांनीच दिले होते. त्यातून शहराचा एक तपाचा मंत्रीपदाचा दुष्काळ संपणार होता. मात्र, या आश्वासनाला वर्ष होत आले, तरी ते पूर्ण न झाले नाही. त्यामुळे हे सुद्धा आश्वासनाचे गाजर तर ठरणार नाही ना अशी चर्चाही रंगली होती. 

लांडगे आणि जगताप यापैकी एकाला राज्यमंत्रीपद, तरी मिळेल, अशी आशा होती व आहे. जगताप यांची तर आमदारकीची चौथी टर्म आहे. दोन्ही सभागृहांचा त्यांचा अनुभव आहे. तर, लांडगे हे तरुण, तडफदार आणि मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे आपल्याच आमदार मंत्री होतील, अशी आशा या दोघांच्या समर्थकांना वाटते आहे. दुसरीकडे दोन टर्म आमदार राहिलेले भाजपच्या मावळ या बालेकिल्याचे आमदार बाळा भेगडे यांचेही निष्ठावान म्हणून मंत्रीपदासाठी नाव घेतले जात आहे.

ते पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. तर, जगताप हे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोन अध्यक्षांतील एक मंत्री होतात, का याकडेही पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भेगडे यांना जरी मंत्री केले, तरी या मावळ पट्याचा 'बॅकलॉग' भरून निघणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना आता प्रतीक्षा आहे, ती मुख्यमंत्री परतण्याची आणि मंत्रीमंडळ विस्ताराची. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com