पिंपरी पालिका आयुक्त हर्डीकर यांची बदली होणार ? 

shravan_hardikar_pimpri awaiting trasfer
shravan_hardikar_pimpri awaiting trasfer

पिंपरीःराज्यातील सत्ताबदलामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आय़ुक्तही बदलणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विश्वासदर्शक ठराव मंजूर होताच लगेचच पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील हर्डीकर यांना फडणवीसांनीच नागपूरहून पिंपरीत आणलेले आहे.


राज्यात आता सत्तेत आलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी या पक्षांच्या हिटलिस्टवर असल्याने आतापर्यंतच्या आय़ुक्तांत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले हर्डीकर यांची लगेचच उचलबांगडी होईल, अशी चिन्हे आहेत. तसेही नवी विटी नवे राज्य या न्यायाने प्रशासनात लगेचच मोठा खांदेपालट होत असतो.

आपल्या मर्जीतील अधिकारी नवे सत्ताधारी मोक्याच्या ठिकाणी आणतात.  पिंपरी पालिका आयुक्तपद मोक्याचे नसले, तरी हे पद व त्यातही हर्डीकर हे पालिकेतील विरोधक व आता राज्यात सत्तेत आलेले राष्ट्रवादी व शिवसेना व कॉंग्रेसच्या चांगलेच डोळ्यावर आलेले आहेत. 


सत्ताधारी भाजपच्या सांगण्यानुसार त्यांचा कारभार होत असल्याने त्यांना सत्ताधाऱ्यांच्या हातातील कळसूत्री बाहूली  अशी  उपमा विरोधकांनीत्यांना दिली होती.   त्यामुळे २७ एप्रिल २०१७ ला शहरात आलेले हर्डीकर यांची तीन वर्षाची मुदत पूर्ण करण्यापूर्वीच   बदली होण्याचा संभव आहे. 


सव्वा दोन वर्षातच २०२२ ला पुन्हा पालिका निवडणूक असल्याने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी राष्ट्रवादी आपल्या हिटलिस्टवर असलेल्या हर्डीकरांऐवजी दुसरा मर्जीतील आयुक्त आणण्याची शक्यता आहे.  

दुसरीकडे शहराचे पोलिस आयुक्त,मात्र बदलण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. फक्त सव्वादोन महिन्यांपूर्वीच (२१ सप्टेंबर) ते शहरात आल्याने लगेच त्यांची बदली होईल, असे वाटत नाही.तसेच त्यांच्या बदलीची मागणी  कुणी करण्याचीही शक्यता नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com