पिंपरीचा उमेदवारच होता कच्चा? निवडणुकीनंतर भाजपला लागला शोध!

भाजपचे शहर प्रभारी माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विनोद तावडे हे काल पक्ष संघटनेच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शहर पक्ष कार्यालयात शहरातील मतदारसंघनिहाय विधानसभा निवडणुकीचा आढावा तेथील पक्षाचे उमेदवार, संयोजक आणि प्रभारी यांच्याकडून घेतला.पिंपरीतील उमेदवार हा कच्चा तसेच लादलेला होता. त्याला शिवसेनेतूनच विरोध होता. त्यामुळे भाजपने चांगले काम करूनही तेथे पराभव झाला,अशीतेथील पराभवाची कारणमिमांसा या बैठकीत केली गेली
Pimpri BJP Says Gautam Chabukswar was Weak Candidate in Front of Anna Bansode.jpg
Pimpri BJP Says Gautam Chabukswar was Weak Candidate in Front of Anna Bansode.jpg

पिंपरी : शिवसेनेचा उमेदवार असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी राखीव मतदारसंघात भाजपने चांगले काम केले. पण, उमेदवारच कच्चा आणि लादलेला असल्याने हे सीट गेले, असा फीडबॅक भाजपच्या शहर प्रभारींनी सोमवारी घेतलेल्या विधानसभा निवडणूक निकाल आढावा बैठकीत त्यांना देण्यात आला. मतदारसंघाच्या ग्रामीण भागात झालेली विकासकामे आणि युतीमुळे भोसरीत लीड हे गतवेळपेक्षा पाचपट झाले,अशी माहिती यावेळी दिली गेली.

भाजपचे शहर प्रभारी माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विनोद तावडे हे काल पक्ष संघटनेच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शहर पक्ष कार्यालयात शहरातील मतदारसंघनिहाय विधानसभा निवडणुकीचा आढावा तेथील पक्षाचे उमेदवार, संयोजक आणि प्रभारी यांच्याकडून घेतला. शहरातील तीनपैकी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुक्रमे महेश लांडगे व लक्ष्मण हे विजयी झाले. तर, पिंपरीमध्ये शिवसेनेच्या अॅड. गौतम चाबुकस्वारांचा पराभव झाला.

भोसरीत गतवेळी लांडगे हे अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे त्यांचे लीड जेमतेम १५ हजार होते.यावेळी युती झाल्याने ते पाचपट झाले. त्या जोडीने भोसरीच्या ग्रामीण भागात प्रथमच मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकासकामामुळे मोठ्ठा विजय झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 

भाजप पदाधिकाऱ्याकडून कारवाईची धमकी?

पिंपरीतील उमेदवार हा कच्चा तसेच लादलेला होता. त्याला शिवसेनेतूनच विरोध होता. त्यामुळे भाजपने चांगले काम करूनही तेथे पराभव झाला,असे तेथील पराभवाची कारणमिमांसा या बैठकीत केली गेली. चुका झाल्याचे मान्य करण्यात आले.त्या भविष्यात सुधारण्याचा सल्ला यावेळी दिला गेला. पिंपरी आणि भोसरीची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या या मतदारसंघाच्या प्रतिनिधींनी व्यवस्थित दिली.

मात्र, चिंचवडमधून तशी ती दिली गेली नाही. त्याबाबत विचारणा करताच या बैठकीच्या बातम्या देऊ नका, नाहीतर कारवाई करू, अशी दमबाजी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केली.चिंचवडमध्ये निम्याने लीड कमी झाले असले,तरी मतदान वाढले असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या एका प्रतिनिधीने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com