pimpri-bjp-letter-bomb-on-shivsena | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड भाजपचा शिवसेनेवर लेटरबॉम्ब

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शिवसेनेने मावळमधून उमेदवारी दिली, तरच भाजपचे कार्यकर्ते काम करतील, असा लेटरबॉम्ब भाजपने आज टाकला.त्यातून पिंपरी चिंचवड भाजपची बारणे यांच्या विरोधात असलेली प्रचंड खदखद उघड झाली. त्याव्दारे युती झाली, तर मावळमधील उमेदवारीचे काहीसे संकट शिवसेनेपुढे उभे राहिले आहे.

पिंपरी: मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शिवसेनेने मावळमधून उमेदवारी दिली, तरच भाजपचे कार्यकर्ते काम करतील, असा लेटरबॉम्ब भाजपने आज टाकला.त्यातून पिंपरी चिंचवड भाजपची बारणे यांच्या विरोधात असलेली प्रचंड खदखद उघड झाली. त्याव्दारे युती झाली, तर मावळमधील उमेदवारीचे काहीसे संकट शिवसेनेपुढे उभे राहिले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यासह सात नगरसेवकांनी हा लेटरबॉम्ब आज फ़ोडला. या मागणीचे पत्र त्यांनी शहर भेटीवर आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिले. 

पवार हे शहर भाजप अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. तर,ही मागणी करणारे इतर नगरसेवक हे जुने भाजपाई असून ते पवारांचे पाठीराखे समजले जातात. आणि जगताप हे बारणे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.युती झाली नाही, तर जगताप हेच मावळमधून भाजपचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.
 
गडकरी यांना दिलेल्या पत्रात भाजप नगरसेवक म्हणतात, "आमचा युतीला विरोध नाही. तो बारणेंच्या उमेदवारीला आहे.कारण त्यांनी सातत्याने भाजप सरकारच्या निर्णयांवर टीका केलेली आहे. गतवेळी त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपने जीवाचे रान केले.मात्र, त्यांनी त्याची जाण ठेवली नाही. भाजप कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला नाही.

स्थानिक पातळीवरही त्यांना भाजपचा त्रास नव्हता. तरीही त्यांनी पालिकेतील भाजपच्या कारभारावर टीका केली आणि प्रसिद्धी मिळवली. परिणामी भाजपचा कोणताही कार्यकर्ता त्यांचे काम करण्यास उत्सुक नाही.त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली, तर त्यांना पराभव पहावा लागेल आणि त्याचे खापर भाजपवर फुटेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख