पिंपरी महापौर निवडणूक : भाजपला विजयाची खात्री, तरी व्हीपची खबरदारी

पालिकेच्या १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे विजयाची खात्री त्यांना आहे. तरीही प्रथा म्हणून पक्षाच्याच उमेदवाराला मत द्या, असा व्हीप काढला असल्याचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे
BJP Issues Whip to Corporators in Wake of Mayor Election
BJP Issues Whip to Corporators in Wake of Mayor Election

पिंपरी : उद्याच्या पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने सावधगिरी म्हणून आज व्हीप जारी केला. पालिकेत बहुमत असूनही राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही खबरदारी घेतली आहे.

पालिकेच्या १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे विजयाची खात्री त्यांना आहे. तरीही प्रथा म्हणून पक्षाच्याच उमेदवाराला मत द्या, असा व्हीप काढला असल्याचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. भाजपविरोधात प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने उमेदवार उभा करुन ही निवडणूक बिनविरोध होऊ दिलेली नाही. नगरसेवक फुटण्याची भीती नसल्याने भाजपने आपल्या नगरसेवकांना सहलीला बाहेरगावी नेलेले नाहीत. फक्त व्हीप काढला आहे. त्यांचे सर्व नगरसेवक शहरातच आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com