भाजपच्या लोकसभा प्रचाराचा श्रीगणेशा पिंपरी-चिंचवडमधून होणार 

भाजपच्या लोकसभा प्रचाराचा श्रीगणेशा पिंपरी-चिंचवडमधून होणार 

पिंपरीः भाजपच्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुक प्रचाराचा श्रीगणेशा पिंपरी-चिंचवडमधून येत्या तीन तारखेला जाहीर सभेने होणार आहे. ती जंगी करण्याचा पण पक्षाने केला आहे. एक लाखाची गर्दी जमविण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेसाठी ठेवण्यात आले आहे. ही सभा यशस्वी करून विरोधकांसह मित्रपक्षांच्याही भुवया उंचावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

पक्षाने सुरु केलेल्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीअंतर्गत ही पहिली जाहीर सभा शहरातील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणार आहे. लाखाची गर्दी करीत ती जंगी करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या खुमासदार शैलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुक्रवारी टिप्स दिल्या. या सभेची जबाबदारीही फिक्‍स करण्यात आली आहे.

शिरूर व मावळ लोकसभा मतदारसाठी ती होणार आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजप आढावा बैठका तसेच नंतर जाहीर सभा घेणार आहे. आढावा बैठक घेणे सुरु झाले आहे. त्यात शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघाची ही बैठक झाली. तर, सभांची सुरवात 3 तारखेला उद्योगनगरीतूनच होणार आहे. नंतर अशा बैठका राज्यातील लोकसभा मतदारसंघात घेतल्या जाणार आहे. मात्र, अशा सभांसाठी माणसं जमवणं सगळ्यात अवघड काम असल्याची कबुली दानवे यांनीच शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आढावा बैठकीत दिली. तरीही येत्या वर्षभरात (लोकसभा व विधानसभा निवडणुक असल्याने) माणसे न्यावी, आणावी लागतील,असे ते म्हणाले. बूथनिहाय 25 कार्यकर्ते केले,तर मतदारसंघात 48 हजाराची फौज उभा राहील. ते दुचाकीवर एकाला बसवून आले,तरी सभेला एक लाखाची गर्दी होईल, असा कानमंत्र दानवेंनी यावेळी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना दिला.

शिरूर व मावळसाठीची पिंपरी-चिंचवडमधील ही पहिली सभा यशस्वी केली,तर अनेकांच्या भुवया उंचावतील,असेही ते म्हणाले. त्यांचा हा रोख शिवसेनेकडे होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com