Pimpri BJP Demands Maval Constituency For Laxman Jagtap | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

शिवसेनेच्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा; जगतापांच्या उमेदवारीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उत्तम कुटे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने आज दावा केला. हँटट्रिकच्या तयारीत असलेल्या या मतदारसंघात पक्षाने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी माहिती मागणी पक्षाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील एकवीस नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पिंपरी : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने आज दावा केला. हँटट्रिकच्या तयारीत असलेल्या या मतदारसंघात पक्षाने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी माहिती मागणी पक्षाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील एकवीस नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मावळवर भाजप दावा करणार असून त्यासाठी पक्ष पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ असल्याचे व्रुत्त फक्त 'सरकारनामा'ने काही वेळापूर्वी व्हायरल केले होते.ते तंतोतंत खरे ठरले.

मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या मागणीचा नक्की विचार करू,असे या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मावळमधील पक्षाची ताकद पाहता हा मतदारसंघ पक्षाकडे घेण्याचे आमचेही प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे सांगण्यात आले. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते एकनाथ पवार,स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर संदीप चिंचवडे,ज्येष्ठ नगरसेवक शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे, तुषार हिंगे,तुषार कामठे,संदीप वाघेरे, अभिषेक बारणे,माया बारणे, झामाबाई बारणे, कैलास बारणे, अर्चना बारणे,निर्मला कुटे, शर्मिला बाबर,आरती चोंधे,उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, नामदेव ढाके,चंद्रकांत नखाते, सागर अंघोळकर हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटले.

यावेळी अभिषेक बारणे यांच्या लेटरहेडवर सर्व पाच बारणे नगरसेवकांनी लेखी मागणी सुद्धा केली. मतदारसंघाचा विचार करता जगताप यांनाच उमेदवारी देणे योग्य ठरेल, अशी मागणी या पत्राद्वारे केल्याचे अभिषेक बारणे यांनी या भेटीनंतर 'सरकारनामा'ला सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख