pimpri-atal-bihari-vajpayee-condolence-meeting | Sarkarnama

अटलजींच्या श्रद्धांजलीसाठी उद्या पिंपरीत सर्वपक्षीय शोकसभा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणातील सावरकर भवनात साडेचार वाजता शोकसभा होणार आहे. 

पिंपरी: दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणातील सावरकर भवनात साडेचार वाजता शोकसभा होणार आहे. 

अटलजी प्रेमी आणि मित्र परिवारातर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे समन्वयक अमोल थोरात यांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी अजातशत्रू होते. प्रत्येक भारतीयाने त्यांचा आदर केला. गुरुवार, दि. 16 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे भारताचे एक रत्न निखळले. एक ओजस्वी व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या केवळ आठवणी आपल्याकडे आहेत. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यातर्फे या सभेत अटलजींना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. आपले आयुष्य देशासाठी समर्पित करून निस्वार्थ देशसेवा केलेल्या अटलजींना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शहरवासीयांनी उपस्थित रहावे,  असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख