तुम्ही सांगा, तिथून लढतो : विलास लांडे 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमदेवाराबाबतचा सस्पेन्स राष्ट्रवादीने कायम ठेवला असून तो वाढविलाही आहे. तशाच प्रकारे या पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांनीही लोकसभा लढणार की विधानसभा याचे पत्ते ओपन केले नाहीत.
तुम्ही सांगा, तिथून लढतो : विलास लांडे 

पिंपरीः शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमदेवाराबाबतचा सस्पेन्स राष्ट्रवादीने कायम ठेवला असून तो वाढविलाही आहे. तशाच प्रकारे या पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांनीही लोकसभा लढणार की विधानसभा याचे पत्ते ओपन केले नाहीत. "तुम्हीच सांगा, लोकसभा लढू की विधानसभा' या शब्दांत पत्रकारांचा बाउंसर त्यांनी टोलवला. त्यामुळे 2019 ला ते नक्की कुठली निवडणूक लढविणार याचा सस्पेन्स कायम राहिला आहे. 

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन 16 ते 22 जुलैपर्यंत केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लांडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजय वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष आणि स्पर्धेचे आयोजक विशाल वाकडकर आदी यावेळी उपस्थित होते. 

विधान परिषेदेची उमेदवारी न दिल्याने नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,""मी विधान परिषदेची उमेदवारी मागितलीच नव्हती. त्यामुळे नाराज व्हायचा प्रश्‍नच नाही. उलट माझे नाव चर्चेत कसे आले,तेच कळत नाही. शहरातून भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे उत्सुक होते. त्यामुळे पक्षाने येथून कोणाला संधी न देता समतोल साधला असावा. मात्र, भाई यांना सुद्धा विधानपरिषद मिळाली नाही, त्याचे वाईट वाटते. त्यांच्या जेष्ठत्वाचा विचार करून (पंचावन्न वर्षे पूर्ण) तरी, त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. ती न मिळाल्याची मला खंत आहे''. 

भोसरीच नाही,तर राज्यभरातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून महिलांना रात्री घराबाहेर पडणे दुरापास्त झाल्याचा आसूड त्यांनी राज्य सरकार व गृहखाते असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढला. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे निष्क्रिय असल्याचे सांगत त्यांच्यावरही त्यांनी खरमरीत टीका केली. शहरातील तीनपैकी फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघातच बांधकाम परवाने बंद करण्याचा निर्णय स्थायी समिती घेईपर्यंत आयुक्त काय गोट्या खेळत होते,अशी विचारणा त्यांनी केली. त्याचवेळी हा निर्णय पत्रकारपरिषद घेऊन जाहीर करणारे भाजपचे चिंचवडचे आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका करणे,मात्र त्यांनी आवर्जून टाळले. या दोघांची राजकारणापलिकडील मैत्री असल्याने ते एकमेकांवर अजिबात टीका करीत नाहीत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com