पिंपरी पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समिती सभापती निवडणुकीसाठी चारच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे.
पिंपरी पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध?

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समिती सभापती निवडणुकीसाठी चारच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. 

येत्या गुरुवारी (ता.10) ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या मुदतीत सत्ताधारी भाजपच्याच चार नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिकताच उरली आहे.

विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समिती सभापतिपदांसाठी ही निवडणूक होत आहे. पालिकेत भाजपचे असलेले बहुमत लक्षात घेता विरोधी पक्षांनी या पदांसाठी अर्जच दाखल केले नाही. 

भाजपकडून माधुरी कुलकर्णी (विधी), स्वीनल म्हेत्रे (महिला व बाल कल्याण), सीमा चौगुले (शहर सुधारणा) आणि संजय नेवाळे (क्रीडा) यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज दाखल केले.

या चारही समित्यांची मुदत संपल्याने गेल्या पालिका सभेत (ता.20) नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेतील तैालनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडला गेला. त्यानंतर आता समिती सभापतीची ही निवड होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com