शेतकरी, मराठा युवकांची अडवणूक करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार : मराठा महासंघ

उच्च शिक्षणासाठी मराठा समाजाला निम्मी फी सवलत आहे. तरीही काही संस्थाचालक ती पूर्ण घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध तक्रार करा. त्यांना धडा शिकवू. तसेच युवक आणि शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांनाही वठणीवर आणू, असा इशारा अखिल भारतीय युवक मराठा महासंघाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिला.
शेतकरी, मराठा युवकांची अडवणूक करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार : मराठा महासंघ

पिंपरीः उच्च शिक्षणासाठी मराठा समाजाला निम्मी फी सवलत आहे. तरीही काही संस्थाचालक ती पूर्ण घेत आहेत. त्यांच्याविरुद्ध तक्रार करा. त्यांना धडा शिकवू. तसेच युवक आणि शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बॅंक अधिकाऱ्यांनाही वठणीवर आणू, असा इशारा अखिल भारतीय युवक मराठा महासंघाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिला.

श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ या दोन्ही शासकीय योजनेचा मराठा समाजातील तरुणांना म्हणावा तसा उपयोग झालेला नाही, असा दावाही महासंघाच्या पदाधिकार्यानी पत्रकारपरिषदेत केला. ३१ मार्च २०१८ पर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत किती विद्यार्थ्यांना, किती रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून किती गरजु युवक युवतींना उद्योग व्यवसायासाठी किती रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. याची सविस्तर आकडेवारी जाहीर करावी, निव्वळ शासन आदेश काढून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणीही करावी, या योजनांचा सक्षमपणे निधी वापरला जावा यासाठी शासनाने जाहिरात करावी, अशा मागण्या महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी यावेळी केल्या. 

मराठा आरक्षण हा आमचा हक्कच आहे, तो आम्ही मिळवणारच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी प्रदेश संघटक संतोष लांडगे व शहराध्यक्ष उदय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पिसाळ म्हणाले, की समाजातील सर्व युवक युवतींना शिक्षण, उदयोग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी येणा-या अडीअडचणीवर मात करण्यासाठी राज्यभरातील महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. 

कै. अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढण्याचे काम केले, मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मागणी व अडवणुक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण करुन अर्ज भरल्यानंतर बॅंक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेला नाही, असे सांगत कर्ज देण्याचे नाकारतात. 
पिळवणूक करतात, असे निदर्शनास आले आहे. शेतक-यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बॅंक अधिकारी अडवणूक करतात. माताभगिनींना छळतात. अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या दलालांना वठणीवर आणण्यासाठी महासंघ आवाहन करतो आहे, की अशा बँक अधिका-यांना उघडे पाडण्यासाठी मराठा महासंघाकडे तक्रार करावी. अखिल भारतीय युवक मराठा महासंघ त्यांचा योग्य समाचार घेईल. 

प्लॅस्टिक बंदीचा निर्णय चांगला असला,तरी तो कोणतीही पुर्वतयारी न करता घेण्यात आल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱी म्हणाले.तसेच प्लॅस्टिक उत्पादकाऐवजी त्याचा वापर करणाऱ्यांवरील कारवाईचा त्यांनी निषेध केला. प्लॅस्टिकला पर्याय न देता घाईगडबडीने हा निर्णय घेतला गेल्याने सर्वसामान्य,व्यापारी आणि उद्योजक असे सर्वच सभ्रंमावस्थेत आहेत, असे ते म्हणाले. 
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com