pimpari maratha kranti morcha | Sarkarnama

सकल मराठा मोर्चाची पिंपरी-चिंचवडला निषेध सभा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

पिंपरी : विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज चिंचवडगावातील चापेकर चौकात निषेध सभा घेण्यात आली. नंतर आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी पोलिसांना दिले. चिंचवड ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ही सभा घेतली. 

निवेदने देऊनच नव्हे,तर आंदोलन करूनही आपल्या मागण्यांची दखल शासन स्तरावर घेतली जात नसल्याने ही निषेध सभा घेण्यात आली. चापेकर स्मारकासमोर सकाळी ती झाली. या सभेनंतर मागण्यांचे निवेदन स्थानिक चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समान नागरी कायदा लागू करावा, कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित फाशी द्यावी या प्रमुख मागण्या आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख