मध्यप्रदेशात चार संतांना मंत्रिपदाचा दर्जा; भय्यू महाराजांचा समावेश

मंत्रिपदासाठी आता आमदार, खासदार होण्याची गरज आता राजवटीत राहिलेली नाही. राजकारण न करताही राज्यमंत्रिपदाचा दर्जा आध्यात्मिक क्षेत्रातील चौघांना काल देण्यात आला. त्यात मूळचे महाराष्ट्रातील उदयसिंह देशमुख तथा भय्यूमहाराज यांचा समावेश आहे. त्यामुळे किमान संतांना तरी भाजपने अच्छे दिन आणले आहेत, असे आता म्हणता येणार आहे. यानिमित्ताने साधुसंत मंत्री झाल्याची घटना प्रथमच देशात घडली आहे.
मध्यप्रदेशात चार संतांना मंत्रिपदाचा दर्जा; भय्यू महाराजांचा समावेश

पिंपरीः मंत्रिपदासाठी आता आमदार, खासदार होण्याची गरज आता राजवटीत राहिलेली नाही. राजकारण न करताही राज्यमंत्रिपदाचा दर्जा आध्यात्मिक क्षेत्रातील चौघांना काल देण्यात आला. त्यात मूळचे महाराष्ट्रातील उदयसिंह देशमुख तथा भय्यूमहाराज यांचा समावेश आहे. त्यामुळे किमान संतांना तरी भाजपने अच्छे दिन आणले आहेत, असे आता म्हणता येणार आहे. यानिमित्ताने साधुसंत मंत्री झाल्याची घटना प्रथमच देशात घडली आहे.

भाजपची सत्ता व शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असलेल्या मध्यप्रदेश सरकारने काल यासंदर्भातील जीआर काढला. राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीकिनाऱ्याजवळील क्षेत्रात वृक्षारोपण, जलसंरक्षण आणि स्वच्छता या विषयावर कायमस्वरुपी जनजागृती करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर पाच सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात भय्यूमहाराज व इतर चार आध्यात्मिक गुरु आहेत. त्यात एका कॉम्प्युटर बाबाजीही आहेत. यानिमित्ताने आता धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातून राजकारणात नेतृत्व निर्माण होऊ लागले आहे 

महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराज हे एक मोठे प्रस्थ आहे. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराजांना बोलावले जाते. गुजरातमधले नरेंद्र मोदींचे सद्भवना उपोषण त्यांच्याच मध्यस्थीनेच सोडवण्यात आले होते. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. 

भय्यू महाराजांचे मुळ नाव उदयसिंह देशमुख. विश्वासराव देशमुख आणि कुमुदनीदेवी देशमुख यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यावर मुंबईतील एका कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पूढे त्यांनी सियाराम कंपनीसाठीच्या फॅब्रिक्स उत्पादनासाठी मॉडेलिंगही केले. त्यातून त्यांना ग्लॅमर मिळाले. पण, मॉडेलिंगसारख्या झगमगाटी आणि पेज थ्री कल्चर असलेल्या कॉर्पोरेट जगात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी ते क्षेत्र सोडले. समाजकार्य करण्याचे ठरवले. 

श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थ ट्रस्टच्या माध्यमातून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात समाजकार्य केले जाते. या ट्रस्टचा उद्देश लोकांना पूजा-अर्चा शिकवणे हा नाही. तर, भूकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हा आहे. या माध्यमातून बुलढाण्यातील खामगाव येथे अनाथाश्रम चालवला जात आहे. मध्यप्रदेशातही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी मोठे कार्य केले जात आहे. त्‍यांच्‍या सुर्योदय आश्रमाच्‍या माध्‍यमातून शेतीच्‍या विकासासाठी सुर्योदय कृषी तीर्थ प्रकल्‍प, पर्यावरण संवर्धनासाठी सुर्योदय ग्राम समृध्‍दी योजना, सुर्योदय स्‍वयंरोजगार योजना, तीर्थ क्षेत्र स्‍वच्‍छता अभियान, दारिद्र्य उन्‍मुलन अभियान, आयुर्वेदीक औषधी प्रकल्‍प, एडस् जनजागृती अभियान, कन्‍या भ्रुणहत्‍या जनजागृती अभियान, बळीराजा ज्ञान प्रबोधन योजना संस्‍कार कला, क्रिडा केंद्र आदी प्रकल्‍प चालविले जातात. असा हा मॉडेल ते अध्यात्मीक गुरू हा भय्यू महाराजांचा प्रवास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com