पिचड भाजपत गेले अन् 39 वर्षांची आमदारकी गमावून बसले

पिचड हे नाव आता विधानसभेत दिसणार नाही...
पिचड भाजपत गेले अन् 39 वर्षांची आमदारकी गमावून बसले

नगर ः वर्षानुवर्षे एकाच घरात आमदारकी राहिलेल्या पिचड कुटुंबांची परंपरा या वर्षी खंडीत झाली. भाजपमध्ये जावून विजयाचे स्वप्न वैभव पिचड यांचे धुळीस मिळाले. वडील मधुकर पिचड यांनी तब्बल ३४ वर्षे आमदारकी जपली. मुलाने मात्र पाच वर्षातच ती खंडीत केली.

१९८० मध्ये काॅंग्रेसच्या तिकिटावर मधुकरराव पिचड आमदार झाले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उदयानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ ऱाहत पुढील निवडणुका लढविल्या. १९९९ ची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढविली. त्यापुढील प्रत्येक निवडणुकीत त्यांना यश आले.

तब्बल ३४ वर्षे आमदारकी केल्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत मुलगा वैभव पिचड यांना उमेदवारी देऊन आमदार केले. आदिवासींचे नेते म्हणून पिचड यांचा उल्लेख होत होता. वैभव पिचड यांनी गेल्या पाच वर्षात कामे केली, परंतु निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पक्षांतर केले. मागील ३९ वर्षाची घरात आमदारकीची परंपरा वैभव पिचड यांच्यामुळे खंडीत झाली. भाजपमध्ये जाऊन त्यांनी राष्ट्रवादीची एकनिष्ठता सोडली. हाच मुद्दा विरोधकांनी पकडला आणि आदिवासींच्या मनात बिंबविला.

भांगरे कुटुंबाचे राजकीय वैर
अकोले येथील अशोक भांगरे हे पिचड यांचे राजकीय वैरी. प्रत्येक निवडणुकीत पिचड यांना त्यांनी विरोध करून विरोधकही जिवंत आहेत, हे दाखवून दिले. २००९ च्या निवडणुकीत भांगरे यांना तीन नंबरची मते मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत ते तीन नंबरवरच राहिले. या वर्षी मात्र त्यांनी निवडणूक न लढविता डाॅ. किरण लहामटे यांना साथ देत पिचड कुटुंबाची आमदारकी घालविली. या निवडणुकीत भांगरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com