कोल्हापुरात महापुरामुळे पेट्रोल, डिझेलची टंचाई 

..
kop1-final
kop1-final

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराचा चोहोबाजूनी संपर्क तुटल्यामुळे पेट्रोल डिझेल आणि गॅसची टंचाई होण्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहेत.  पन्नास ,शंभर, दोनशे अशाच टप्प्यात पेट्रोल धारकांकडून पेट्रोल दिले जात आहे. शहरातील काही पंपावर एक-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. 

गेली सहा दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात महापूर स्थिती निर्माण झाली आहे. कोकणातून येणारी सर्व वाहतूक बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग पुणे-बंगलोर हाही मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे. आणखीन दोन दिवस अशी स्थिती राहण्याची शक्‍यता आहे. जिल्हा प्रशासनाने सहा व सात ऑगस्टला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. 

महापुराचा विळखा घट्ट होत असल्यामुळे कोल्हापूर शहरात येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्याची जवळ पेट्रोल डिझेल आणि गॅस वितरणावर बसत आहे. सकाळपासूनच पेट्रोल पंपावर रांगा लागल्या असून आहे. तो साठा जास्तीत जास्त आणखीन एक दिवस पुरण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर कोल्हापुरात पेट्रोल डिझेल आणि गॅसची टंचाई जाणवणार आहे. 

इंधन वाहतूक करणारी वाहनेच पावसाने अडकून पडली आहेत. कोल्हापूर व परिसरासाठी मिरजेहून इंधन घेऊन वाहने येतात. गेल्या दोन दिवसांपासून ही वाहने अनेक मार्गावर पाणी आल्याने पोहचू शकलेली नाहीत. परिणामी उपलब्ध असलेला इंधन साठा संपत आला आहे. लोकांनाही याची जाणीव होऊ लागल्याने पंपावर इंधन भरण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काही पंपही पुराच्या पाण्याखाली गेले आहेत, काही पंपांकडे जाणारे मार्ग बंद आहेत, त्याचाही ताण इतर सुरू असलेल्या पंपावर पडला आहे. त्यातून मोठी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com