कोल्हापुरात आणखी दोन दिवस पेट्रोल- डिझेल मिळणार नाही

कोल्हापुरात आणखी दोन दिवस पेट्रोल- डिझेल मिळणार नाही

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल  आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल-डिझेल मिळणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले.

पूर परिस्थितीमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. परिणामी गेल्या दोन दिवसात पेट्रोल-डिझेलचा एकही टॅंकर कोल्हापूर शहरात येऊ शकला नाही. अशीच अवस्था जयसिंगपूर हातकंगले परिसरात आहे उदगाव जवळ आलेल्या पुराच्या पाण्यामुळे त्या परिसरात एकही पेट्रोल-डिझेलचा टँकर पोहोचू शकला नाही.

पेट्रोल- डिझेलची टंचाई होईल म्हणून अनेक ग्राहकांनी वाहनां च्या पेट्रोल-डिझेलच्या टाक्या फुल करून घेतल्या आहेत. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार मानगावे यांनी सांगितले,की  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमुळे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. परिणामी एकही टॅंकर कोल्हापुरात येऊ शकला नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील तीन ते चार दिवस पेट्रोल-डिझेल उपलब्ध होऊ शकेल याची खात्री नाही. आवश्यक ठिकाणीच प्रवास करावा असे आवाहन पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com