खोतकरांसारखे लोक आम्ही कपडे शिवायला ठेवतो..

....
arjun-khotkar-nilesh-rane
arjun-khotkar-nilesh-rane

पुणे : बरोबर आहे, अर्जुन खोतकरांसरखे लुक्के आमची उंची मोजणारच! कारण त्याच्यासारखे आम्ही कपडे शिवायला ठेवतो. तुझी उंची कळली आम्हाला खोतकर. युती असून सुद्धा तू पडलास, अशी जहरी आणि खालच्या पातळीवरील टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी अर्जुन खोतकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे  .

तुझी उंची किती अन् तू बोलतो किती, असे म्हणत  खोतकर यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला राणे यांनी उत्तर दिले,

वादग्रस्त विधानासाठी कायमच चर्चेत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत  ट्विट केले होते. स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात?की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीशी त्यांनी मांडवली केली होती  बाळासाहेबांचा तो इतिहास लोक विसरलेले नाहीत, अशी टीका राणे यांनी करत शिवसेनेला पुन्हा एकदा अंगावर घेतले होते.

याला उत्तर देताना  खोतकर म्हणाले होते की ,बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने राणे कुटुंबियांना सर्व काही मिळाले. असे उपरे लोकं खाल्ल्या मिठाला न जागणारे असतात. त्यामुळे अशा लोकांना गद्दाराशिवाय दुसरी उपमाच असू शकत नाही, असा टोला खोतकर यांनी लगावला होता. त्याच पार्श्वभूमीवर राणे यांनी आम्ही असे लोक कपडे शिवायला ठेवतो. युती असताना सुद्धा तुम्ही निवडून नाही येऊ शकला नाही, असे सांगत खोतकर यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर मीठ चोळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com