Peoples anger reflected from Ballot says Sanjay Raut | Sarkarnama

जनतेचा राग मतपेटीतून व्यक्त झाला : संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असे मी म्हणणार नाही. मात्र लोकांचा असलेला राग यातून व्यक्त झाला आहे, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली : आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असे मी म्हणणार नाही. मात्र लोकांचा असलेला राग यातून व्यक्त झाला आहे, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 

सध्याच्या कलांनुसार तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता संपून काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. राऊत यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना या निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली. या निकालांमुळे आत्मपरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी मोदी सरकारचे नांव न घेता सांगितले. कुणाला? या प्रश्नावर बोलताना 'समझनेवालोंको इशारा काफी है,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख