`रोहित यांना तुम्ही आशीर्वाद द्याल, अशी माझी खात्री आहे'

""महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने कुस्ती क्षेत्रात यश मिळवीत आपले स्थान आणि योग्यता सिद्ध केली आहे. आजची कुस्ती स्पर्धा उत्कृष्ट संयोजन आणि मल्लांच्या सहभागाने सर्वोत्तम ठरेल, यात शंका नाही. या स्पर्धेतून राज्य व देशपातळीवरील अनेक मल्ल निर्माण व्हावेत. स्पर्धेसाठीची प्रचंड उपस्थिती पाहता, रोहित यांना तुम्ही आशीर्वाद द्याल, अशी माझी खात्री आहे,'' अशी मार्मिक टिप्पणी ज्येष्ठ नेते तथा राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
`रोहित यांना तुम्ही आशीर्वाद द्याल, अशी माझी खात्री आहे'

कर्जत : ""महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने कुस्ती क्षेत्रात यश मिळवीत आपले स्थान आणि योग्यता सिद्ध केली आहे. आजची कुस्ती स्पर्धा उत्कृष्ट संयोजन आणि मल्लांच्या सहभागाने सर्वोत्तम ठरेल, यात शंका नाही. या स्पर्धेतून राज्य व देशपातळीवरील अनेक मल्ल निर्माण व्हावेत. स्पर्धेसाठीची प्रचंड उपस्थिती पाहता, रोहित यांना तुम्ही आशीर्वाद द्याल, अशी माझी खात्री आहे,'' अशी मार्मिक टिप्पणी ज्येष्ठ नेते तथा राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

येथे युवा नेते रोहित पवार यांच्या संकल्पनेतून झालेल्या साहेब चषक कुस्ती स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार राहुल जगताप, "हिंद केसरी' योगेश दोडके, तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, "महाराष्ट्र केसरी' अशोक शिर्के, रावसाहेब मगर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार, संदीप भोंडवे, राष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षक शबनम शेख, मल्लसम्राट अस्लम काझी, हरियानाचे रणधीर पोंगल, राजेंद्र पवार, सुनंदा पवार यांच्यासह कर्जत व जामखेड तालुक्‍यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ""या कुस्ती स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख कुस्तीपटूंना हक्काचे व्यासपीठ आणि संधी मिळाली आहे. या संधीचे ते सोने करतील. एके काळी ग्रामीण भागात सुवर्णकाळ लाभलेली कुस्ती कालौघात मागे पडत चालली आहे. तिला ऊर्जितावस्था येण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.'' 

रोहित पवार म्हणाले, ""कुस्तीला पवार साहेबांनी नावलौकिक मिळवून दिला. त्यांनी राजाश्रय मिळवून दिला आहे. त्यामुळे खेड्यातील, गल्लीतील कुस्ती टीव्हीवर झळकली. या स्पर्धेमुळे अनेक मल्ल भविष्यात मैदान गाजवतील.'' 

राजेंद्र गुंड व्यासपीठावर 
कर्जत-जामखेड मतदारसंघात "राष्ट्रवादी'च्या उमेदवारीवरून राजेंद्र गुंड अडून बसले आहेत. युवा नेते रोहित पवार यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्‍यतेने त्यांची टीकाटिप्पणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी रोहित यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती; परंतु गुंड आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. रोहित यांनीही त्यांचा आयोजनाबाबत नामोल्लेख करून मान दिला. यामुळे गुंड यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा स्पर्धेच्या ठिकाणी रंगली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com