People will again Show faith in Modi Says Raosaheb Danve | Sarkarnama

देशातील जनता पुन्हा मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल - रावसाहेब दानवे 

आनंद इंदानी 
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

''नुकत्याच झालेल्या तीन राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशात चांगले काम करते आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल," असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

बदनापूर : ''नुकत्याच झालेल्या तीन राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशात चांगले काम करते आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवेल," असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामकथा समारोपासाठी रावसाहेब दानवे आले होते. यावेळी आगामी निवडणुका व तीन राज्यातील निकालांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारले असता दानवे म्हणाले, "देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा बहुमत प्राप्त करू. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तिन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. अर्थात त्यास तिथले स्थानिक प्रश्न व परिस्थिती जबाबदार आहे. या तिन्ही राज्यात पूर्वी भाजपचे सरकार होते त्यामुळे 'अँटी इन्कन्मबन्सी' फॅक्‍टरचा प्रभाव देखील असू शकतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची कामगिरी अत्यंत चांगली आहे." 

तीन राज्यांच्या निकालाचा परिणाम नाही
"देशात राबविण्यात येत असलेल्या विकासात्मक योजना व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा वाढत असलेला प्रभाव याचे आकलन निश्‍चितच जनता करते आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तीन राज्यात लागलेल्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. पुन्हा एकदा देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता देत भाजप व मित्रपक्षांना बहुमताने विजयी करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक घेण्याबाबत राज्य सरकारला कुठलीही घाई झालेली नाही. दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्‍यता दिसत नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे भरीव मदत मागण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख